धारावीत दूषित पाणीपुरवठारहिवाशांची पालिकेकडे तक्रार


धारावीत दूषित  पाणीपुरवठा रहिवाशांची पालिकेकडे तक्रार 

मुंबई- धारावी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्‍याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासुन धारावीतील गोल्डफिल्ड कंपाऊंडमध्ये  गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक स्थानिक रहिवाशांना पोटाचा त्रास होत आहे.याबाबत रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप परिस्थिती 'जैसे थे ' आहे. तरी पालिकेने पिण्यायोग्‍य पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

धारावीमध्ये काही विभागांत सकाळी,तर काही विभागांत सायंकाळी पाणी येते.मागील  सहा दिवसांपासून धारावी
गोल्डफिल्ड कंपाऊंडमध्ये पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्याला दुर्गंधी येत आहे; तर अन्य  काही ठिकाणीही दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच खांबदेव नगर येथील वसाहतीतील काही इमारतींना दोन दिवसांपूर्वी असाच दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. गोल्डफिल्ड कंपाऊंडमध्ये दूषित पाण्यामुळे अनेक रहिवासी आजारी पडले आहेत.याबाबत दादर जी नॉर्थ पालिका विभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या