आगरी मालवणी जत्रेच्या आयोजकावर गुन्हा दाखल

 आगरी मालवणी जत्रेच्या आयोजकावर गुन्हा दाखल



डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनारुग्णाची वाढती संख्या पाहता डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानात शिवसैनिक प्रकाश तेलगोटे यांनी १ तारखेपासून आगरी मालवणी जत्र भरविली आहे.जत्रे एक हजार पेक्षा जास्त नागरिक एकावेळी गर्दी करत असल्याने आयोजकाने शासनाच्या नियमाचे मोडल्याचे दिसले.याची दाखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आयोजकावर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.शासनाच्या नियमांचे उलंघ्घन करून २५० पेक्षा जास्त लोक, विनामास्क, सोशल डीस्टसिंगचे पालन न करणे तसेच जिल्हाधिकारी ,ठाणे शहर पोलीस आयुक्त यांचे मनाई आदेशाचे उलंघ्घनकेलेले असून करोना आणि ओमाक्रोन संबंधी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. विष्णूनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. सस २/ भा.द.वि.कलम २६९,२७०,२७१,१८८,सह महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ व साथीचे रोग प्रतीबंधक कायदा १८९७ चे क्र.३ आणि आपत्ती व्यवस्थापक आधी.२००५ चे क्र.५१ ( ब ) प्रमाणे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ ( ३ ), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. आगरी मालवणी जत्रा २०२१ कर्यक्रमाची दिलेली परवानगी त्वरित रद्द करण्यात आली आहे. मैद्नातील स्टोल आणि साहित्य दोन दिवसात काढून मैदान रिकामे करावे असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या