कणकवली तालुक्यातील महिला जटामुक्तअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचे यश.


 कणकवली तालुक्यातील महिला जटामुक्त
खिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांचे यश.


जटा काढून घ्यायला घाबरायचे कारण नाही - डॉ सूर्यकांत तायशेटे  आणि विजय चौकेकर यांचे प्रतिपादन.


 शरद घोगळे , डॉ सतीश पवार , शैलेश घाडी, प्रताप चव्हाण यांची उपस्थिती.


गेली काही वर्षे डोक्याच्या केसातील जटेमुळे त्रस्त महिलेची समजूत घालून तिच्या मनातील भीती घालवून ती जटा काढून घ्यायला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांना यश आले असून नुकतेच कणकवली येथे  त्या महिलेला जटा मुक्त केले आहे.


याकामी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे विजय चौकेकर तसेच  शरद घोगळे यांनी पुढाकार घेतला. कणकवली येथे डॉ सूर्यकांत तायशेटे , वरिष्ठ चिकित्सक यांनी महिलेची आरोग्य तपासणी केली. 


केसांची निगा राखावी. केसात जटा झाल्या तर त्याला दैवी कारण असल्याचे मानू नये , झालेल्या जटा डॉक्टरांना दाखवून काढून घ्याव्यात असा सल्ला डॉ सूर्यकांत तायशेटे यांनी दिला. 


यावेळी डॉ सूर्यकांत तायशेटे यांचा कणकवली येथील रेडिओलॉजिस्ट आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे मार्गदर्शक डॉ सतीश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर केशकर्तनकार प्रताप चव्हाण यांचा सत्कार शरद घोगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्ते शैलेश घाडी हे उपस्थित होते.


कोणत्याही अंधश्रद्धेला न भिता जटा मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सदर दंपतीचा डॉ सूर्यकांत तायशेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यापुढे केसातील जटा काढून घ्यायला अजूनही व्यक्ती पुढे येतील असा विश्वास विजय चौकेकर यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या