घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५४ वा कला व क्रिडा महोत्सव थाटात







घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५४ वा कला व क्रिडा  महोत्सव थाटात



मुंबई- चेंबूरमधील घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५४ वा कला व क्रिडा महोत्सव नुकताच थाटात पार पडला.बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर व चेंबूर नागरिक सहकारी बॅंकेच्या संचालक मीनाक्षी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

या घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या कला व  क्रिडा महोत्सवासाठी गेल्या महिनाभरापासून विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचा सांगता समारंभ  महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पार  पडला.यावेळी महापूजा,
हळदीकुंकू समारंभ , मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला होता. मंडळाचे आधारस्तंभ प्रसिद्ध  कलादिग्दर्शक बबन काटवटे यांच्यासह पदाधिकारी विनायक पाटील,किशोर पाटणकर आणि चारुदत्त ठाकूर,आर्चिस पाटणकर यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गणेश मिरगूले यांनी केले.या महोत्सवाला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे,ठाकरे  गटाचे खासदार अनिल देसाई यांच्यासह विविध राजकीय,सामाजिक आणि सिने क्षेत्रातील मान्यवर  आदींनी आवर्जून हजेरी लावली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या