जे एम एफ संस्थेत ' महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा.


जे एम एफ संस्थेत ' महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

    दिनांक १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दीन देखील जगभरातील कामगार चळवळीच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.

        आजच्या दिवशी दोन्ही गोष्टींचे अतुल्य महत्व आणि योगदान आहे. जन गण मन शाळेत देखील महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

      जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे तसेच मुख्याध्यापक , शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शारीरिक प्रशिक्षक सौ.वैशाली शिंदे, एकनाथ चौधरी, अप्लेश खोब्रागडे यांनी ध्वज उभारण्याची जबाबदारी घेतली.

   डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी ध्वज फडकावून ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली तर सर्वांनी राष्ट्रगीत म्हंटले.नंतर  सर्व कर्मचारी वर्गाचे अभिवादन केले.

       महाराष्ट्राचे नाव ज्याला माहीत नाही असा माणूस या पृथ्वीतलावर असणे म्हणजे विरळच.ज्या महाराष्ट्राने आपल्याला संस्कार दिले ,जिथे आपण घडलो, घडत आहोत अशा आपल्या जडणघडणी मध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.असे सांगून डॉ राजकुमार कोल्हे यांनी महाराष्ट्रा विषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच काम हीच पूजा आहे असे मानून अविरतपणे कार्य करणारे सर्वच जागतिक कामगारांचे सुद्धा अभिवादन  करून त्यांना सन्मान दिला.

      आजच्या दिवशी म्हणजे दिनांक १ मे रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली असली तरी पूर्वापार संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आपल्या  महाराष्ट्राला  'ना आदी ना अंत ' आहे असे सांगून डॉ प्रेरणा कोल्हे यांनी त्यांच्या महाराष्ट्रा बद्दल च्या भावना व्यक्त केल्या.

       कार्यक्रमाच्या शेवटी संगीत शिक्षिका सौ श्रेया कुलकर्णी यांनी ' जय जय महाराष्ट्र माझा ' हे  महाराष्ट्र अभिमान गीत उपस्थित सर्व शिक्षकांसह  गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या