कविता!! सुखसमृद्धीची तेजोमय वारी !! (नवकवी एस. नरेंद्र)

 




!! सुखसमृद्धीची तेजोमय वारी !!


बघता बघता नवीन वर्ष आलं,


आणि संपत आला जानेवारी... !


पण अजूनही दिसत नाही,


ती सुखसमृद्धीची तेजोमय वारी ..!!


अजूनही चाचपडत आहे मनुष्य,


समाधानाची शोधतोय वेल दारोदारी ..!


पण, मृगजळ असणाऱ्या ह्या दुनियेत,


पुन्हा हताश होऊन तो फिरतोय माघारी ..!!


नियतीने मानवास आज जखडून ठेवलंय,


तरीही आशेच्या त्याला दिसताहेत सरी ...!


प्रचंड वेदना झेलूनही राहतोय तो स्थिर,


कारण येणारा भविष्यकाळ देईल नक्की उभारी ..!!


--------------/////////-----

नवकवी

एस. नरेंद्र

 (विरार पूर्व)

 मो.नं. 989 21 82 822.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या