" नजरेचा इशारा "
तुझ्या नजरेचा माझ्या नजरेला,
कळाला सखे जेव्हां इशारा
तिथेच माझा दिल खल्लास जाहला...!!
येऊन सामोरी तिरकस नजरेचा तुझ्या, टाकलास तो विखारी कटाक्ष
दिलाचे तुकडे माझ्या विखरले तुझ्या आसपास... !!
लागली हुरहूर मनाला, माझ्या तुज भेटण्याची
कशी पडलीय भूरळ, मज तुझ्या सौंदर्याची...!!
काय जादू तू ,मजवरी केली
तुझ्या आठवणीत जीवाची तगमग झाली...!!
काय जादूगिरी तू , सखे मजवरी केली काही मला सुचेना
झालोय बघ मी तुझा दिवाना
फिरुन कधी तू मला, कुठे भेटशील सांग ना?...!!
नयन कटाक्षाने असे, घायाळ करणे नाही खरे
भास आहे कि शाश्वत,कसे समजू मी हे बरे?... ।।
रचनाकार. ©️®️ कवी दीप.
कल्याण प. जिल्हा ठाणे.
महाराष्ट्र राज्य.
मो.क्र. ८६० ५५ ६४ ८६८.
0 टिप्पण्या