शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. . !

  नवीन नेटवर्क टॉवरचे काम सुरु... नॉट रिचेबल वरवंडी लवकरच

होणार नेटवर्कयुक्त...!






संगमनेर- मागील सहा महिन्यांपासून वरवंडी आणि परिसरातील नागरिकांना मोबाइलला नेटवर्क नसल्याने मनस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

वरवंडी गावच्या सरपंच सौ.किरण गणेश गागरे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते गणेश गागरे व वरवंडी परिसरातील  सामाजिक बांधिलकी जपणारे युवक यांचे मार्फत जिओ मध्ये असणारे जास्तीत जास्त सिमकार्ड पोर्टींग विनंती टाकून जिओला नेटवर्क अडचणींविषयी जागरूक करण्याचा प्रयन्त केला यात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला पण जिओने काही दखल घेतली नाही,


वरवंडी गावच्या सरपंच सौ.किरण गणेश गागरे यांचे पती  सामाजिक कार्यकर्ते गणेश गागरे व वरवंडी परिसरातील सामाजिक बांधिलकी जपणारे युवक यांचे मार्फत सदर वरवंडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय, याबद्दल शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे  संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,

शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्याशी चर्चा झाली आणि सुरु झाला.... नॉट रिचेबल वरवंडी गावं लवकरात लवकर  नेटवर्कयुक्त कसे होईल यासाठीचा पाठपुरावा...

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून सदर अडचणींविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेपर्यंत सदर प्रश्नाविषयी चर्चा  केली त्यानंतर शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे  संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी मा.श्री.अश्विनीजी वैश्नवसाहेब,मा.दुरसंचारमंत्री,भारत सरकार तसेच प्रोटोकॉल प्रमाणे दूरसंचार मंत्रालयाशी संबंधित सर्वांना मेल केला.

महामहीम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब यांचे  सचिवालयाचे विशेष कर्तव्यावर अधिकारी आर. के. शर्मा यांनी सदर मेलला विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमप्राधान्याने सोडविण्यात यावा अशी रिमार्क देत संबंधित विभागाला सूचित केले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यसचिव मा.सिताराम कुंटे साहेब यांचे कार्यालय तसेच टिम जिओ आणि VI,मुख्य आँफिस, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे  संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांच्याशी कॉल वर चर्चा तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेला वि (vi) ने केलेल्या मेल वर लवकरच नेटवर्क टिम अपाँईट करुन अहवाल आल्यानंतर योग्य त्या उपाययोजना करून वरवंडी परिसराला पुढील २-३महिन्यात नेटवर्क व्यवस्थित उपलब्ध होईल असे आश्वासन दिले.

०२ डिसेंबर २०२१ रोजी  दूरसंचार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी एस.सी. राजीव साहेब यांनी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र संघटनेचे  संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना  पाठविलेल्या पत्रात जून २०२२ टॉवर उभारणी पुर्ण होईल असे  कळविले. शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी दूरसंचार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी एस.सी राजीव साहेब यांना शालेय विद्यार्थी  आणि नागरिकांची होणारी गैरसोय याविषयीचे गांभीर्य सूचित केले,  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूरसंचार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी एस.सी. राजीव साहेब यांनी शक्य होईल तितके लवकर टॉवर बसविण्याबाबत टेलिकॉम कंपनीला आदेश दिले. आज वरवंडी गावामध्ये टॉवर चे काम सुरु झाल्याने सर्वच स्तरातून  समाधान व्यक्त होत आहे.



🚩जय शिवराय...धन्यवाद...टिम जिओ व दूरसंचार मंत्रालय आणि सदरचा पाठपुरावा करत असताना सहकार्य करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांचे वरवंडी  ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐

👆लवकरच जिओ नेटवर्क टिमचे टाँवर व्यवस्थापन पुर्ण होऊन वरवंडी परिसराला कायस्वरुपी नेटवर्क उपलब्ध होईल.


सदैव आपलाच,

शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील,

संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,

🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩

मो.9579745774

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या