मनसेच्या मागणीला यश ...

 मनसेच्या मागणीला यश ...

 डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सामान्य जनतेसाठी उपचार सुरु होणार..

 डोंबिवली ( शंकर जाधव )मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात इतर आजारावरील वैद्यकीय सेवा बंद करून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु झाले. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असताना दुसरीकडे मात्र इतर आजारांसाठी गरीब रुग्णांना अतोनात त्रास झाला.यावर गरीब रुग्णांचे हाल होत असल्याचे पासून मनसेचे पालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला. गरीब रुग्णांवर उपचार सुरु करावे अशी मागणी मनसेने केली होती. मनसेच्या या प्रयत्नाला यश आले असून ९ नोव्हेबर पासून शास्त्रीनगर रुग्णालयात सामान्य जनतेसाठी उपचार सुरु होणार आहे. या रुग्णालयातील कोविड सेंटर बंद होणार आहे.

  डोंबिवलीतील पार पडलेल्या कोरोना परिषदेत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम,इरफान शेख यांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्याचे हाल होत आहे , म्हणून लवकरात लवकर या रुग्णालयात  सामान्य जनतेसाठी उपचार सुरु करावे अशी आग्रही मागणी केली होती. तश्या प्रकारचा ठरावही कोरोना परिषदेत करण्यात आला होता.मार्च पासून ऑगस्ट महिन्यापर्यत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कमी होत असल्याने आणि इतर वैद्यकीय सेवा जनतेला मिळावी म्हणून यासाठी मनसेचे प्रयत्न सुरु होते.आता पालिका प्रशासनाने हे रुग्णालय नोन कोविड म्हणून जाहीर  केल असून या रुग्णालयात ९ तारखेपासून सामन्य जनतेला उपचार मिळणार आहे. त्याआधी या  रुग्णालयात निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या