मुंबई, दि. ०८ / ११ / २०२६
सन २०१४ मध्ये मुंबईतील अतिशय प्रसिद्ध व प्रतिष्ठित गुरू नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा येथे १२ वी विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत चाललेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण
वसंत शामराव उटीकर, मुंबई येथील रहिवासी यांनी उघडकीस आणले होते.
मुंबईच्या महाविद्यालयीन इतिहासात हे एवढे मोठे पहिलेच प्रकरण होते, ज्यात पहिल्यांदाच मुख्याध्यापक व स्वीय सहाय्यक यांना भ्रष्टाचारात रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणात सबळ पुरावे होते. त्यावेळी हे प्रकरण संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात गाजले होते.
त्यांच्या या धाडसाबद्दल त्यावेळचे ACB प्रमुख मा. प्रवीण दीक्षित साहेब आणि मा. विश्वास नांगरे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ACB कार्यालयात त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला होता व प्रशस्तीपत्रे देण्यात आली होती. (दि. १०/०७/२०१४ - ACB, दि. २२/०७/२०१४ - विक्रीकर विभाग)
परंतु, आज १२ वर्षे पूर्ण झाली तरी या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागलेला नाही. याबाबत त्यांनी अतिशय तीव्र खेद व्यक्त केला आहे.
त्यांनी कोणत्याही न्यायालयावर, विभागावर किंवा व्यक्तीवर आरोप करत नाही. असा ही प्रश्न उपस्थित केला आहे. पण तरीही त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
*अशा संवेदनशील महाविद्यालयीन भ्रष्टाचार प्रकरणात वर्षानुवर्षे न्याय मिळत नसेल, तर पुढे तक्रारदार तरी पुढे कसे येतील? आणि केवळ शासनाची प्रशस्तीपत्रे मिळून कोणता उद्देश साध्य होईल?*
जर भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणाऱ्यालाच १२ वर्षे न्यायासाठी वाट पाहावी लागत असेल, तर भविष्यात कोणीही पुढे येण्याचे धाडस करणार नाही, अशी त्यांनी भीती व्यक्त केली आहे.
*मी ही प्रशस्तीपत्रे परत करत नाही. ती माझ्या प्रामाणिकपणाचा पुरावा आहेत. परंतु न्यायाशिवाय हा सन्मान अपूर्ण वाटतो, हेच माझे प्रामाणिक मत आहे.*
असे मत आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
या प्रकरणाच्या अंतिम निकालाबाबत कोणी न्यायालयीन जाणकार, तज्ज्ञ, अभ्यासू मला मार्गदर्शन करेल का? अशी त्यांनी व्यथित होऊन विचारणा करत आहेत असे ही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
*- वसंत शामराव उटीकर*
मुंबई
मोबाईल : ९३२४५६१५९१.

0 टिप्पण्या