खंबाळे (औंध), ता. कडेगाव, जि. सांगली गावात सात वर्षांपासून दिवाळी भेटवाटपाची परंपरा!

ॲड. अच्युतराव नारायण भोसले (साहेब) यांचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

खंबाळे (औंध), ता. कडेगाव, जि. सांगली | प्रतिनिधी – निलेश सूर्यवंशी

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद संपूर्ण गावासोबत साजरा करण्याची एक अनोखी परंपरा खंबाळे गावात गेल्या सात वर्षांपासून जपली जात आहे.

खंबाळे (औंध), ता. कडेगाव, जि. सांगली येथील ॲड. अच्युतराव नारायण भोसले (साहेब) यांच्या पुढाकारातून दरवर्षी दिवाळीनिमित्त संपूर्ण गावातील नागरिकांना दिवाळी फराळाच्या बॉक्सचे वाटप करण्यात येते. यंदाही मोठ्या उत्साहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गेल्या सात वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवून ॲड. अच्युतराव भोसले (साहेब) यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा, प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि गावातील सर्वांनी एकत्रितपणे सणाचा आनंद घ्यावा, या उदात्त भावनेतून ते हा उपक्रम राबवत आहेत.

आजच्या काळात स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण गावाचा विचार करून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सात वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही दिवाळी भेटवाटपाची परंपरा खंबाळे (औंध), ता. कडेगाव, जि. सांगली. गावासाठी अभिमानाची बाब ठरत असून, ॲड. अच्युतराव नारायण भोसले(साहेब) यांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी – निलेश सूर्यवंशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या