कर्करुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 'दिवाळी धमाका'“स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचा गीत गायनाचा कार्यक्रम”आणिदिवाळी फराळ व साहित्य वाटप

परळ येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वामी संस्थे तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या 'दिवाळी धमाका' कर्क बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्या बरोबर संस्थेचे कार्यकर्ते मनापासून करित आहेत, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६, रोजी सायंकाळी ५ ते ८ परळ येथील शिरोडकर वातानुकूलित सभागृहात साजरा झाला, फेसकॉमचे, श्री सुरेश पोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्याचप्रमाणे सर्व देणगीदार व हितचिंतक हजर होते.

श्री. मोहन कटारे कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्वामी कार्यकर्ते व विरंगुळा चे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी गेले १५ दिवस मेहनत घेवुन जवळ जवळ रुपये ९००/- च्या दिवाळीच्या फराळा पासून ते उटणे, साबण, तेल, चादरी, साडी अशा वस्तु एकत्र करुन मोठ्या हँड बॅग मध्ये घालून एकूण २५० कर्क बाधित रुग्णांना दिले. तत्पूर्वी स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक यांचे वाद्यवृंद सायंकाळी पाच ते सात या वेळेत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्याध्यक्ष श्री मोहन कटारे यांनी केले, श्री सुरेश पोटे, शंभू भाई, विजय भाई गाढा, सौ उर्मिला जाधव, तृप्ती पवार तसेच सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते स्वामीचे अध्यक्ष श्री सुरेश लाड यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन श्री अनिल तावडे यांनी केले.
श्री हरमळकर खजिनदार व श्री गोविंद राणे सचिव यांनी वितरण व्यवस्था पाहिली, दिवाळी धमाका सोहळा सौ ममता खेडेकर यांना रचना खुळे सावंत, माळोदे, नाडकर्णी, लबीर कौर, प्रियांका व गुरव आदी महिलांकडून तसेच आनंद धायफुले, दिनकर घोसाळकर, दशरथ खमितकर , शिवाजी गावकर व स्वामी विरंगुळाचे इतर कार्यकर्ते यांनी भरपूर सहकार्य केले तसेच श्री महिनकर यांनी २५० कर्क रुग्णांना कूपन्स वितरित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या