वृक्ष लागवड ही मानवांच्या भविष्यातील मोठी गरज आहे ! -- दिपक जोशी, संस्थापक नक्षत्रवन,



---------------------------------------------
मुंबई :--  निसर्गाने मानवाला अनेक गोष्टी उत्पन्न करून दिलेल्या आहेत. त्यातील एक  मूलभूत गरज म्हणजे वृक्ष होय. तो मानवाच्या किती उपयोगी आहे हे मानवाना अजूनपर्यंत कळलेले नाही. ते समजून घेणे आवश्यक आहे. असे उदगार नक्षत्रवन चे संस्थापक दिपक जोशी काका यांनी नुकतेच श्रीवर्धन म्हसळा येथे एका कार्यक्रमात काढले. यावेळी प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक व यू - ट्यूब वृत्तवाहिनी च्या वतीने स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात करण्यात आला. 
               दिपक जोशी काका यांनी ' नक्षत्रवन व श्रीस्वामीसमर्थ संस्कार केंद्राच्या माध्यमातून जनतेला उपयोगी असलेल्या प्रत्येकाच्या जन्म नक्षत्राच्या झाडांची लागवड करून त्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा होतो ते समजावून सांगतात. त्यांनी वडघर - पांगलोली, म्हसळा, जिल्हा - रायगड. येथे विविध प्रकारची 3500 झाडे लावलेली आहेत. त्यांच्या कर्तृत्वला पर्याय नाही. कारण " मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही. जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, झाडांचे महत्व कळणार नाही. जोपर्यंत त्यांची लागवड करून त्यांची जोपासना करणार नाही, तुमच्या भावनाना सुद्धा किंमत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही, कुणाचेही मन बिघडू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ संपू नये अशी शक्ती हवी आणि कधीही विसरू नये असे कर्म हवे. जे आपण नक्षत्रवन व श्रीस्वामी समर्थ संस्कार केंद्राच्या माध्यमातून समाजपुढे ठेवले आहे. कारण चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे, योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे. " वरील प्रमाणे आपण आपल्या नक्षत्र वनात येणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन करून आपल्या जीवनात झाडाना किती महत्व आहे हे प्रात्यक्षिका सहित समजावून सांगता. 
          यशस्वी  " आयुष्याच्या प्रवास करताना  कांही गोष्टी सोडायच्या असतात, भूतकाळाचा पश्चlताप  आणि  भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतो. ह्याचा विचार करून प्रकट महाराष्ट्र गेली सात वर्ष अश्या व्यक्तींचा शोध घेऊन त्याच्या  कार्याचा आढावा घेऊन त्यांची जगाला ओळख करून  देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आजपर्यंत केलेल्या या जगावेगळ्या व्यासंगाची दखल प्रकट महाराष्ट्राने घेऊन आपला येथोचित सन्मान केलेला आहे. आमच्या नक्षत्र वनातील व श्रीस्वामीसमर्थ संस्कार केंद्रातील झाडे उच्च शिक्षित आहेत. कारण मी रोज दोन तास या सर्व झाडांची शाळा घेतो. त्यांना त्यांचे स्वतःचे महत्व पटवून देतो. त्यांची समाजात ओळख कशी आहे ते त्यांना सांगतो असेही जोशी काका यांनी आपल्या भाषणात सांगितले. या समारंभात पत्नी सौ. ज्योती जोशी, मुलगा - कौस्तुभ जोशी,  विवेकस्नेही पत्रकार - मल्हारी घाडगे, रवी कोतापकर व दत्ताराम दळवी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या