“Meta AI सुद्धा चुकू शकतो!” कसे ते खाली वाचा


*कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्तरातील एका शब्दाची चूक आणि एका निस्सीम चाहत्याने केलेली दुरुस्ती!  “AI कितीही प्रगत झाले, तरी शब्दामागची भावना, आशय आणि संदर्भ जपण्याची जबाबदारी शेवटी माणसाचीच!”*

दिनांक : २२ सप्टेंबर २०२६

 “Meta AI सुद्धा चुकू शकतो!” — AI च्या उत्तरातील एका शब्दाची चूक आणि एका निस्सीम चाहत्याने केलेली दुरुस्ती.*


हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने, दमदार संवादफेकीने, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने, अभिनयाच्या आगळ्यावेगळ्या शैलीने आणि अविस्मरणीय भूमिकांनी रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप उमटविणारे महान अभिनेते राजकुमार — ‘जानी’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला होता. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

या ऐतिहासिक जन्मशताब्दी वर्षानिमित्त, मी वसंत शामराव उटीकर, राजकुमार (जानी) यांचा एक निस्सीम चाहता — Ardent Fan — म्हणून त्यांना मनःपूर्वक अभिवादन करण्यासाठी एक विशेष बॅनर तयार केला आहे. या बॅनरमध्ये राजकुमार यांच्या विविध भूमिका, विविध अंदाज आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
बॅनरवर स्पष्टपणे नमूद केले आहे —
“राजकुमार (जानी) — या महान कलाकारास ८ ऑक्टोबर २०२६ रोजी १०० व्या जन्मशताब्दीनिमित्त
एका निस्सीम चाहत्याचे मनःपूर्वक अभिवादन!”

— वसंत शामराव उटीकर
राजकुमार (जानी) फॅन
भायखळा, मुंबई.

Meta AI कडून झालेली एक छोटी, पण अर्थपूर्ण चूक! हा बॅनर मी Meta AI ला दाखविला. बॅनरचे कौतुक करताना Meta AI ने शेवटी मला विचारले —

“हा बॅनर तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करणार आहात का जयंती दिवशी? खूपच सुंदर श्रद्धांजली होईल.”

यावेळी मी Meta AI चे लक्ष एका महत्त्वाच्या भाषिक आणि भावनिक संदर्भाकडे वेधले.

मी स्पष्ट केले की, “श्रद्धांजली” हा शब्द सामान्यतः एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर आदरांजली व्यक्त करण्याच्या संदर्भात वापरला जातो. त्यामुळे जन्मशताब्दीच्या निमित्ताने तयार केलेल्या माझ्या बॅनरच्या संदर्भात “अभिवादन” हा शब्द अधिक योग्य आहे.

माझे म्हणणे Meta AI ने मान्य केले आणि त्याने उत्तर दिले —

“आपण अगदी बरोबर बोललात वसंत साहेब, माझी चूक झाली, क्षमा असावी.”

तसेच त्याने पुढे जन्मदिन/जन्मशताब्दीच्या संदर्भात “अभिवादन” आणि निधनाच्या संदर्भात “श्रद्धांजली” या शब्दांच्या वापरातील संदर्भ महत्त्वाचा असल्याचे मान्य केले.

“आपल्याकडून अशी चूक कशी झाली?” — Meta AI ला माझा प्रश्न!
यानंतर मी Meta AI ला सहजपणे म्हटले —
“आपल्याकडून अशा प्रकारची चूक अजिबातच अपेक्षित नाही. आपण चुकू शकता यावर माझा विश्वासच बसत नाही!”

त्यावर Meta AI ने पुन्हा आपली चूक स्वीकारली आणि माझ्या सारख्या जाणत्या व्यक्तीने ती निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या छोट्याशा संवादातून मात्र एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर आला —
AI कितीही प्रगत झाले, तरी मानवी विवेकाची गरज संपणार आहे का?
AI अत्यंत उपयुक्त; पण अंतिम पडताळणी माणसाचीच!
आज Artificial Intelligence (AI) अत्यंत वेगाने विकसित होत आहे. लेखन, भाषांतर, माहिती शोधणे, विश्लेषण, चित्रनिर्मिती, संशोधन आणि अनेक प्रकारच्या सर्जनशील कामांमध्ये AI अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
परंतु प्रत्येक शब्दाचा सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक आणि भावनिक संदर्भ अचूकपणे समजून घेणे ही बाब अजूनही तितकीच महत्त्वाची आहे.
“अभिवादन” आणि “श्रद्धांजली” हे केवळ दोन शब्द नाहीत. त्या दोन्ही शब्दांमागे वेगळा संदर्भ, भावना आणि आशय आहे.

म्हणूनच AI ने दिलेली माहिती किंवा तयार केलेला मजकूर डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी विचारपूर्वक तपासणे, संदर्भ पडताळणे आणि आवश्यक तेथे मानवी विवेकाने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
AI हा माणसाचा पर्याय नसून माणसाला मदत करणारे एक प्रभावी साधन आहे.

या छोट्याशा प्रसंगातून माझ्या मते एवढाच संदेश द्यायचा आहे —

“कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी मानवी संवेदना, विवेक आणि संदर्भज्ञान यांना पर्याय नाही.” आणि म्हणूनच —
Meta AI सुद्धा चुकू शकतो!

श्री. वसंत शामराव उटीकर, 
एक सजग जागृत नागरिक, 
राजकुमार (जानी) चा  निस्सीम चाहता - Ardent Fan, 
भायखळा, मुंबई. 
भ्र. ध्व. क्र. ९३२४५६१५९१.
ईमेल-
vasantutikar@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या