🖋️प्रतिनिधी डोंबिवली : रविंद्र जाधव,
भारत देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिवस डोंबिवली पश्चिम गांवदेवी विद्या मंदिर शाळेत मोठया उत्साहाने पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. केशवजी भोईर उपस्थित होते. तर श्री. दीपेश म्हात्रे ( नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका ) आणि श्री. जयेश म्हात्रे ( नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका ), आयुष्यमान जी. टी. शिंदे, ( अध्यक्ष बोधिसत्व चारिटी ट्रस्ट ), सौ. वैशालीताई भोईर (संचालिका गावदेवी विद्यामंदिर ), मनीषा बहेन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय डोंबिवली केंद्र, सेवेकरी श्री. मधुकर भोईर विश्वस्त, श्री. बारकू घावट सर माजी मुख्याध्यापक गांवदेवी विद्या मंदिर यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र हा संदेश विद्यार्थी पर्यत पोहचवून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्रमुख पाहुणे दीपेश म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मनीषा बेहन, घावट सर आणि अध्यक्ष केशव भोईर यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची "वंदे मातरम" या गीताने सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या