खेड फुरूस बीट मध्ये आधारशिला नवचेतना वेलकम मेळावा उत्साहात.




🖋️प्रतिनिधी खेड : दिनेश हुमणे,

आधारशिला नवचेतना वेलकम मेळावा दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खेड अंतर्गत फुरूस बीट मधील चिचघर सुर्वे वाडी इथे करण्यात आले. प्रकल्प अधिकारी शिरिषकर मॅडम यांनी, आहार, आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. त्याच बरोबर मुलांच्या माता यांचे स्वागत करून, मुलांचा शारीरिक बौद्धिक विकास आहार आरोग्य यावर मातांना मार्गदर्शन केले. 



     या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य अपूर्वा जाधव उपस्थित होत्या. आधारशीला नवचेतना कार्यक्रमाबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी शिरिषकर मॅडम एकात्मिक बाल विकास पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन बीट पर्यवेक्षिका देवता काटकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या