डोंबिवली/एमआयडीसी:
पावसाळा सुरू झाल्यापासून एमआयडीसी परिसरात झाडे पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी एम्स हॉस्पिटल रोडवरील एका बंगल्याच्या आवारातील मोठे आंब्याचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या परिसरात अनेक झाडे अतिशय धोकादायक स्थितीत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उद्यान विभाग अधिकारी देशपांडे साहेब उद्या या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार आहेत.
प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी किंवा कोणाचा जीव जाण्यापूर्वी या धोकादायक झाडांवर तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

0 टिप्पण्या