आदिवासी प्रतिष्ठान ओमकार साई बाल संगोपन केंद्राचा स्तुत्य उपक्रम; ठाणाले येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!



समाजातील गोर गरीब गरजू घटकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत, १ जुलै २०२६ रोजी डोंबिवली येथील ओमकार साई बाल संगोपन केंद्र आणि आदिवासी प्रतिष्ठान या दोन सामाजिक संस्थांनी एकत्रित येत एक स्तुत्य उपक्रम राबवला. रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील रा.जि.प शाळा, ठाणाले येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

हा संपूर्ण उपक्रम ओमकार साई बाल संगोपन केंद्राच्या संस्थापिका सौ. सुविधा दांडेकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी प्रतिष्ठान चे संस्थापक मा. श्री. सचिन सागळे  ओमकार साईं चे महावेवस्थापक मा अनिकेत हिंदळेकर मा. श्री. राकेश भोने आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष तुषार शेडगे सदस्य मा.श्री. विनोद जाधव मा.श्री. महेश अधिकारी तसेच ठाणाले शाळेचे शिक्षक माननीय श्री. आंधळे सर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.आदिवासी पाड्यांना भेटी आणि व्यथा जाणून घेतल्या.



शैक्षणिक साहित्य वाटपानंतर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील आदिवासी पाड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांच्या रोजच्या जगण्यातील अडचणी, समस्या आणि मुख्य गरजा जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान, आदिवासी बांधवांच्या व्यथा ऐकून त्यांना तात्काळ धीर देण्यात आला.

"आदिवासी वाड्यांमधील बांधवांना येत्या काळात सर्वतोपरी मदत केली जाईल आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध राहील."

ग्रामस्थ मंडळ ठाणाले तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमात दोन्ही संस्थांच्या मुख्य पदाधिकारी मा. अनिकेत हिंदळेकर मा. श्री.राकेश भोने मा. श्री. सचिन सागळे प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये:

श्री. अनिकेत हिंदळेकर (महाव्यवस्थापक, ओमकार साई बाल संगोपन केंद्र, डोंबिवली)

श्री. राकेश भोने (कार्यकारी सदस्य, ओमकार साई बाल संगोपन केंद्र, डोंबिवली)

यांच्यासह दोन्ही संस्थांचे इतर सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. सुविधा दांडेकर यांच्या प्रेरणेने आणि दोन नामांकित संस्थांच्या एकत्र येण्याने ग्रामीण व आदिवासी भागात राबवलेल्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या