राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने संजय होळकर यांचा गौरव.



-----------------------------------

प्रतिनिधी : दिनेश हुमणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा मुळेखंड येथील श्री संजय जयराम होळकर (उपशिक्षक, पीएम श्री शाळा, मुळेखंड) यांना शुक्रवार दिनांक ५ जून रोजी पनवेल येथे प्रदान करण्यात आला.

  शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार तसेच समाजबांधवांनी प्रत्यक्ष, दूरध्वनी, व्हॉट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले.

             याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. होळकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. "हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे," असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या