सेवा शक्ती संघर्षाच्या अन्न त्याग आंदोलनाला यश; परिवहन मंत्री सोबत 11 जून रोजी निर्णायक बैठक





सरचिटणीस सतीश दादा मेटकरी यांचे आंदोलन मागे; 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली दखल, एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नावर सकारात्मक चर्चा 



(मुंबई दिनांक 9 जून 2026/लोक सत्यवाणी न्यूज प्रतिनिधी बापुना आत्राम 



सेवा  शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस स सतीश दादा मेटकरी यांनी मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले असून राज्य सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या प्रमुख द अधिकार्‍याच्या समवेत 11 जून 2026 रोजी दुपारी एक वाजता मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे 



सेवा शक्ती संघर्ष संघाचे केंद्रीय अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालय मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक तसेच इतर प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली; यावेळी शासनाकडून विविध मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाअधिकारी यांनी सांगितलं 


चर्चा नंतर 11 जून रोजी सेवाशक्ती संघर्ष संघाचे केंद्रीय अध्यक्ष गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश दादा मेटकरी तशी संघटनेच्या प्रतिनिधी सोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे निश्चित करण्यात आले या बैठकीत एसटी कर्मचारीचे करण्यात आले,  बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न वेतन विषयी मागण्या तसेच इतर प्रलंबित विषयावर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे आहे 



मंत्रालयातील बैठकीनंतर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलना स्थळी भेट देऊन शासनाची झालेल्या चर्चा ची माहिती उपस्थित कामगारांना दिली त्यानंतर केंद्रीय कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या हस्ते सरचिटणीस सतीश दादा मिटकरी यांना ज्यूस पाजून अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले 

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांच्या उपस्थितीमुळे आंदोलन स्थळी मोठी गर्दी झाली होती. आंदोलनादरम्यान केंद्रीय उपाध्यक्ष अनुपम दादा खैरनार, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांच्यासह विविध विभागीय व आगार स्तरीय अधिकारी सातत्याने ठाण मांडून बसली होते 


सेवा शक्ती संघर्ष संघाच्या नेतृत्वाने या आंदोलनामुळे शासनाला कामगारांच्या प्रश्नाची दखल घ्यावी लागल्याचा दावा केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितली की, संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्यभरातील कामगाराच्या एक जुटीमुळेच शासन स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे 


आता 11 जून रोजी होण्याच्या बैठकीमुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे 

 बापुना आत्राम 


मुंबई प्रतिनिधी लोक सत्यवाणी  न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या