*संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ NCMC स्मार्ट कार्ड शिबीर संपन्न.*




 *संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ NCMC स्मार्ट कार्ड शिबीर संपन्न.* 

20 मे रोजी संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ, दिंडोशी, गोरेगाव, पूर्व, मुंबई, एस टी परिवहनचा NCMC कॅम्प संपन्न झाला. आजच्या या कार्यक्रमांमध्ये  संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ व विसावा संघ ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी या योजनेचा लाभ घेतला .
आजचा हा एसटी स्मार्ट कार्ड देण्याचा कार्यक्रम आमचे फेस्कॉम अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे
व आरोग्य कमिटीचे विवेक देशपांडे मुबंई विभाग फेस्कॉम अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या सहकार्य व मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला. यशस्वीरीत्या पार पडून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.  याबद्दल मी टेकाळे साहेब, विवेक देशपांडे, उपाध्यक्ष चंद्रकांत खामकर व आमचे सुरेश पोटे सरांचे संघाचा वतीने आभार मानतो असे सहकार्य आमच्या संघात होत राहील ही अपेक्षा आहे. संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष - दिलीप धारकर यांनी संघास असेच सहकार्य करावे म्हणून विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या