पत्रकारिता की संस्कृतीचा नवा संगम? संतोष सावंत यांच्या गायनाने उभा केला चर्चेचा विषय



 "दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते"-पत्रकारिता की संस्कृतीचा नवा संगम? संतोष सावंत यांच्या गायनाने उभा केला चर्चेचा विषय 


 प्रतिनिधी : बापुना आत्राम 

(डोंबिवली /कल्याण/ठाणे,सातारा) 



समाजातील वास्तव्य मांडणारी पत्रकारिता आणि संस्कृती. कला, नाटक, चित्रपट, नाट्य, तमाशा यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून समाज मन घडवणारी अभिव्यक्ती यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे संपते, यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे, याला कारण ठरले,पत्रकार संतोष सावंत यांनी सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेले गीत 

"दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रेखिते _------"


ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक वातावरणात या कार्यक्रमाने वेगळेच स्थान निर्माण केले असून पत्रकारितेच्या चौकटीत राहुन सांस्कृतिक अभिव्यक्ती करणे कितपत योग्य, यावर सामाजिक आणि पत्रकार वर्तुळात मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत, 


 पत्रकार की कलाकार? समाजात नवा प्रश्न 


डोंबिवली आणि कल्याण ठाणे परिसरात झालेल्या चर्चेमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनाचे प्रतिनिधी यांनी मत व्यक्त केले की , पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून समाजाचा आरसा असतो. 

त्याच वेळी कला, संगीत, नाटक, आणि चित्रपट ही देखील सामाजिक परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत. 


संतोष सावंत (कवी, पत्रकार) यांनी गायलेल्या गीतामध्ये संसार, संस्कार, भावानिक संघर्ष आणि नव्या आशेचे चित्रण असल्याचे सांगितले जात आहे. काहींनी याला"पत्रकारितेचा मानवी चेहरा"असे संबोधले, तर काहीं पत्रकारांनी सार्वजनिक व्यासपीठांवर तटस्थता राखणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला, 


 कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून चर्चेला उधाण 


कायदे तज्ज्ञांच्या मते भारतीय राज्यघटनेतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती सांस्कृतिक किंवा कलात्मक अभिव्यक्ती करण्याचा अधिकार आहे, जोपर्यंत त्यातून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा किंवा कोणत्याही व्यक्तीची बदनामी होत नाही. मग पत्रकारितेतील नैतिकता आणि व्यवसायिक तटस्थता याबाबत प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शन तत्त्वांमध्ये पत्रकारांनी सार्वजनिक प्रतिमा जपणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 

पत्रकार सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास त्यांचा त्यांच्या बातमी दारावरी परिणाम होता का, हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे, 


 ठाणे जिल्ह्यात सांस्कृतिक पत्रकारितेचा नवा ट्रेड? 


ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात गेल्या काही वर्षात पत्रकार, लेखक, निवेदक, आणि सामाजिक कार्यकर्ते हे सांस्कृतिक मंचावर सक्रिय होताना दिसत आहेत, 

लोकनाट्य, कवी संमेलन, सामाजिक नाटके आणि संगीत कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक पत्रकार समाजातील प्रश्न अधिक

प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत असल्याची निरीक्षकांचे मत आहे. 


संतोष सावंत यांच्या गायन कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या, काहींनी "पत्रकार फक्त बातमी देत नाही तर समाजांचे संस्कार जपतो,"असे म्हटले .तर काही  "पत्रकारांनी पत्रकारिते पुरते मर्यादित राहावे, असा आक्षेप नोंदवला. 


 "नाटक, चित्रपट, तमाशा हेही समाजसेवेची माध्यम" सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी स्पष्ट केले की.महाराष्ट्राची परंपरा ही शाहिरी, किर्तन, वगनाट्य आणि लोककलेतून समाज जागृती करणारी राहिली आहे. लोकमान्य टिळकांपासून आचार्य अत्रे आणि प्रबोधन कर ठाकरे यांच्यापर्यंत अनेकांनी पत्रकारिता आणि सांस्कृतीक अभिव्यक्तीचा संगम साधला होता, 


त्यामुळे पत्रकार एखादी गीत गातो किंवा सांस्कृतिक मंचावर उपस्थित राहतो, याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता समाज संवादाचे माध्यम म्हणून पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 


 *आक्रमक सवाल: पत्रकारितेवर संस्कृतीचा प्रभाव की संस्कृतीवर पत्रकारितेची छाप?*


कल्याण-डोंबिवलीतील काही युवा पत्रकारांनी मात्र स्पष्ट शब्दात सांगितली की,"आजच्या डिजिटल युगात पत्रकारांवर TRP, प्रसिद्धी आणि सोशल मीडिया इमेज यांचा दबाव आहे. त्यामुळे पत्रकारिता आणि मनोरंजन यातील रेषा पुसट होत चालली आहे"तर दुसरीकडे काही नागरिकांनी संतोष सावंत यांच्या सादरीकरणाचे कौतुक करताना म्हटली की,"समाजात, तणाव, राजकारण आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये 

माणुसकी हरवत चालली आहे.

अशावेळी पत्रकारांनी संवेदनशील कलात्मक अभिव्यक्ती केली तर त्यात चुकीची काय?"


       लोक सत्यवाणी न्यूज चे निरीक्षक 


पत्रकारिता ही समाजसेवा आहे, तर कला ही समाज संस्काराची प्रतिक्रिया आहे. दोन्हीचे ध्येय समाजमन घडवणे हीच असल्याने पत्रकार आणि कलाकार यांच्यातील सीमा अनेकदा
एकमेकांत मिसळताना दिसते. मात्र सार्वजनिक व्यक्तींनी अभिव्यक्ती करताना सामाजिक जबाबदारी, कायदेशीर मर्यादा आणि व्यवसायिक नैतिकता यांचे भान राखणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. 


संतोष सावंत यांच्या गीताने सुरू झालेली ही चर्चा आता ठाणे जिल्ह्याच्या पत्रकार आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठा विषय बनली असून, येत्या काळात पत्रकारितेच्या नव्या सांस्कृतिक 
प्रवाहाला दिशा मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


 https://youtu.be/LTQE_jnY_30?si=0vZs9UNnVVXOXByH




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या