पत्रकार-संतोष सावंत यांनी दाखवले मूळ गाव नरडवेचे वास्तव्य; साध्या-भोळया माणसांच्या आपुलकीचे भारावले वातावरण
लोकसत्यवाणी न्यूज/सातारा प्रतिनिधी:बापुना आत्राम
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं हिरवगार निसर्ग, लाल माती, डोंगरदऱ्या, समुद्राची खारट हवा आणि पाणी माणुसकीने ओथंबलेली साधी भोळी माणसं. पण आजच्या आधुनिकतेच्या धावपळीत गाव , नाती आणि संस्कृती हरवत चालली असताना पत्रकार-संतोष सावंत यांनी आपल्या मूळ जन्मगाव नरडवे गावच्या आठवणींना उजाळा देत कोकणाच्या अस्सल संस्कृतीच जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभं केलं आहे.
"हे……. असं असतं आमचं घर.......ही आमची शेती..... आणि हे मी स्वतः लावलेलं काजूच झाड!"अशा भावनिक शब्दांत संतोष सावंत यांनी आपल्या गावाची ओळख करून दिली. त्यांच्या या साध्या अंत: करणाला भिडणाऱ्या संवादाने उपस्थितांच्या डोळ्यांत गावाबद्दलच प्रेम दाटून आलं.
नरडवे गावातील जुन्या कौलारू घरासमोर उभे राहून सावंत यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. घराभोवती पसरलेली हिरवी शेती, मातीचा सुगंध आणि नात्यांमध्ये असलेली प्रामाणिकता आजही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं."कोकणातील माणूस आजही साधी आहेत, भोळी आहेत; पण त्यांच्यातील आपुलकी ही शहरात लाखो रुपये खर्च करूनही मिळत", असे ते म्हणाले.
आजच्या काळात गावाकडील संस्कृती, परंपरा आणि शेतीकडे तरुणांचं दुर्लक्ष होत असताना संतोष सावंत यांनी आपल्या कृतीतून वेगळा आदर्श उभा केला आहे. पत्रकारितेच्या धकाधकीच्या जीवनातही त्यांनी गावाशी असलेलं नातं जपलं आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
नरडवे गावातील नागरिकांनीही सावंत यांचे कौतुक करताना सांगितली की,"मोठं नाव झाल्यानंतर अनेक जण गाव विसरतात. पण संतोष सावंत आजही गावात येतात, लोकांशी प्रेमाने बोलतात, शेतीची विचारपूस करतात, त्यामुळे गावाला त्यांचा अभिमान वाटतो"
कोकणातील बदलत्या वास्तवावरही त्यांनी भाष्य केले."पूर्वी गावात माणुसकी जास्त होती, पैसा कमी होता. आज पैसा वाढला; पण माणुसकी हरवतेय. रिकामी होत आहेत. शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. हे चित्र धोकादायक आहे,"असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार म्हणून समाजातील प्रश्नांवर आवाज उठवणारी आणि कवी म्हणून संवेदनशील मन जपणारे संतोष सावंत यांचे व्यक्तिमत्व कोकणाच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेले आहे. त्यांच्या कविता मध्ये ही ग्रामीण जीवन, मातीचा सुगंध आणि नात्यांची उब कायम दिसून येते.
आज सोशल मीडियाच्या कृत्रिम दुनियेत माणसं एकमेकांपासून दूर जात असतात नरडवे सारख्या छोट्याशा गावात त अजूनही माणुसकी जिवंत असल्याचं चित्र संतोष सावंत यांच्या माध्यमातून समोर आलं त्यांच्या या गाव भेटीने अनेकांना आपल्या मूळ गावी परतण्याची प्रेरणा मिळत आहे,
कोकणाच्या मातीत वाढलेला हा शब्दांचा योद्धा आज पत्रकारीता आणि साहित्यिक क्षेत्रात नाव कमवत असला, तरी त्यांच्या मनातलं गाव अजूनही तितकंच जिवंत आहे त्यांच्यामुळेच संतोष सावंत यांच व्यक्तिमत्व आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गाव ,शेती संस्कृती आणि माणुसकी याचं नातं जपणाऱ्या संतोष सावंत यांच्या या भावनिक गाव भेटीची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगू लागली असून"मूळ गाव विसरू नका"हा त्यांचा संदेश अनेकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे गावची ही कहाणी आहे

0 टिप्पण्या