* *===श्री राजेंद्र लकेश्री===*
*===========*
*विविध भाषिक साहित्यिक, लेखक, कवी, वृत्तपत्रलेखक व मुक्त्त पत्रकारांसाठी स्थापन झालेल्या पत्रकार उत्कर्ष संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक व मुक्त्त पत्रकार श्री.राजेंद्र लकेश्री यांची बहुमताने निवड करण्यात आली.*
*कामाठीपुरा विभागातील श्री.दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात सल्लागार श्री.लियाकत अल्ली सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अध्यक्षांसह, कार्यकारिणी व विविध समित्यांसाठी निवड करण्यात आली.*
*प्रास्ताविक भाषण डॉ.खंडू माळवे यांनी करून स्वरचंद्रिका आशाताई भोसले तसेच संघाचे सदस्य श्री.प्रकाश बाडकर, बबन जोशी, हरियाण, गणेश नेतिकर इत्यादीना श्रध्दांजली वाहिली.*
*त्यानंतर झालेल्या रितसर कार्यकारिणी निवडमध्ये सर्वश्री डॉ. खंडू माळवे, श्री मुक्त्तार फोपेरे यांची उपाध्यक्षपदी श्री दत्ताराम वंजारे, यांची सरचिटणीस तसेच राजेश्वर जोगू व शाहिद मुल्ला यांची अनुक्रमे चिटणीसपदी निवड करण्यात आली तसेच अशोक परब यांची खजिनदारपदी तर हिशोब तपासण्यापदी भाबय्या गुंडावैना यांची निवड झाली.*
*कार्यकारणी सदस्य म्हणून रामदास गजरे, हेमंत अनुमाला, भालचंद्र डफल, वसंत चिलवेरी व विश्वनाथ भ. तळेकर यांची एकमताने तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.....!*

0 टिप्पण्या