(लोकसत्यवाणी न्यूज,प्रतिनिधी सातारा : बापुना आत्राम )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील दहिवडी आगारामध्ये कार्यरत असलेले वाहतूक नियंत्रक कक्ष अधिकारी श्री. रमेश ज्ञानदेव सावळकर हे आपल्या प्रामाणिक, शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष सेवेमुळे प्रवासी वर्गामध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. वाहतूक नियंत्रण कक्षातील जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत त्यांनी दहिवडी बस स्थानकातील प्रवासानिक कार्यात शिस्त, समन्वय व प्रवासी सुविधा यांचा उत्कृष्ट मेळ घालून आदर्श निर्माण
केला आहे. श्री. सावळकर हे प्रतीक एसटी बस च्या वेळापत्रकानुसार अचूक माहिती देतात. बस आगमन व प्रस्थान वेळा, मार्ग क्रमण विलंब अथवा बदल या संदर्भातील सूचना ती स्पष्ट व प्रभावी पद्धतीने देत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळते. विशिष्ट विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व प्रथमच प्रवास करणाऱ्या नागरिकांना ते अत्यंत सौजन्य पूर्व व संयमी पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दहिवडी बस स्थानकातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुस्थितीत राहण्यास मदत होत आहे.
प्रवाशांनी नम्र वर्तन, शिस्तप्रिय स्वभाव आणि जबाबदारीची जाणीव या गुणांमुळे श्री. सावळकर यांनी सहकारी कर्मचारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे वाहतूक नियंत्रक कक्षामध्ये सतत दक्ष राहून प्रत्येक गाडीचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व प्रवाशांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ते तात्पर्य असतात. त्यामुळे दहिवडी आगारातील प्रशासिक कार्यक्षमते मध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे..
श्री. रमेश सावळकर यांचा सेवा प्रवास देखील प्रेरणादायी मानला जात आहे. राज्य परिवहन महामंडळात रुजू होण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील अंधेरी पूर्व परिसरात सुमारे चार वर्षे रिक्षा चालक म्हणून काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती कुटुंबाचा उदरनिर्वाह व आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी प्रामाणिक परिश्रम घेतले. कठोर मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपले ध्येय निश्चित केले आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वाहक पदावर नियुक्ती मिळवली.
वाहक म्हणून तब्बल 28 वर्षे त्यांनी विविध आगारामध्ये उत्कृष्ट सेवा बजावली विशेषतः फलटण आगारामध्ये कार्यरत असताना त्यांनी प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कामकाज आणि प्रवासी हिताची जपणूक यामुळे चांगली ओळख निर्माण केली होती. आपल्या कामातील सातत्य, प्रशासनिक समज व कर्तव्यनिष्ठा यांच्या बळावर त्यांनी खाते अंतर्गत घेण्यात येणारी वाहतूक नियंत्रक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना वाहतूक नियंत्रक पदावर बढती मिळाली आणि पुढे दहिवडी आगारांमध्ये नियुक्ती करण्यात आली.
सध्या दहिवडी आगारातील वाहतूक नियंत्रक विभागात ते अत्यंत जबाबदारीने कार्यरत असून, आगारातील बस वाहतुकीचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सहकारी कर्मचारी सांगतात सार्वजनिक सेवेमध्ये संयम, जबाबदारी, जनसंपर्क कौशल्य आणि वेळेचे भान किती महत्त्वाचे असते याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
"प्रामाणिक प्रयत्न, चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या बडावरच यशाचे शिखर गाठता येते"असे मत श्री, सावळकर व्यक्त करतात. आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाकडे पाहताना ते नमूद करतात की, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावरच त्यांचे संकल्प पूर्णत्वास गेले, आज प्रवासी सेवेमध्ये कार्य करताना मिळणारे समाधान हेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दहिवडी आगारातील प्रवासी वर्गातून श्री, सावळकर यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. वेळेवर घोषणा, नम्र वर्तन, योग्य मार्गदर्शन आणि तत्पर सेवा यामुळे अनेक प्रवासी त्यांच्याविषयी समाधान व्यक्त करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा अधिक मजबूत होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या