डोंबिवली_ठाणेच्या सांस्कृतिक विश्वासातील बहुआयामी व्यक्तिमत्व: संतोष सावंत यांचे कार्य प्रेरणादायी -बापुना आत्राम




डोंबिवली_ठाणेच्या सांस्कृतिक विश्वासातील बहुआयामी व्यक्तिमत्व: संतोष सावंत यांचे कार्य प्रेरणादायी -बापुना आत्राम 



प्रतिनिधी (सातारा) 

ठाणे जिल्ह्यातील शहर हे सांस्कृतिक, सामाजिक आणि नाट्य परंपरेसाठी ओळखले जाते. या भूमीत अनेक कलाकार, कवी नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते घडले; मात्र आपल्या कलेने, संवेदनशीलतेने आणि समाजाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय श्री संतोष सावंत हे आज डोंबिवली ठाणे परिसरातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले आहेत. अभिनय, काव्य, नाट्य, पत्रकारिता आणि सामाजिक जाणीव या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य सर्वसामान्य साठी आदर्श ठरत आहे.






संतोष सावंत हे केवळ कलाकार नाहीत, तर ती एक विचारवंत, समाज प्रेमी आणि जनतेच्या भावना जाणणारे आणि जपणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अभिनयामध्ये वास्तवतेचा वर्ष दिसून येतो. त्यांनी साकारलेल्या नायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसा उमटवतात. चित्रपट आणि नाटकामधील अधिक कलाकार त्यांच्या अभिनयासमोर फिके पडतात, असे मत अनेक रसिक व्यक्त करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, संवादफेक आणि व्यक्तिरेखेचे संजीव सादरीकरण पाहताना प्रेक्षक भारावून जातात.


डोंबिवली आणि ठाणे परिसरातील सांस्कृतिक चळवळीमध्ये संतोष सावंत यांचा सक्रिय सहभाग नेहमीच दिसून येतो. कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधनासाठीही असते,हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. नाटक, कविता आणि सामाजिक विषयांवरील कार्यक्रमाद्वारे ते युवकांना प्रेरणा देत आहेत. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कार्येही केले आहे. 



संतोष सावंत यांच्या व्यक्तीमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पत्रकारिता आणि सामाजिक जाणीव"लोकसत्यवाणी न्यूज"या माध्यमातून त्यांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडल्याचे कार्य सुरू केली आहे. सामान्य माणसाच्या अडचणी, अन्यायग्रस्ताचे प्रश्न आणि सामाजिक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे आजच्या डिजिटल युगात अनेक माध्यमे आहेत. पण "लोकसत्यवाणी न्यूज"च्या मार्फत केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे यामुळे चॅनलला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.



विशेष म्हणजे संतोष सावंत यांच्या प्रत्येक शॉर्ट आणि मोठ्या व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. त्यांच्या सादरीकरणात वास्तव, संवेदनशीलता आणि कलात्मकता यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. अनेक प्रेक्षक त्यांच्या चॅनलवरील व्हिडिओ प्रथम पाहतात आणि त्यानंतर इतर माध्यमांकडे वळतात.ही बाब त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी आहे, 



सामाजिक क्षेत्रातील त्यांनी अनेक वेळा लोकांसाठी धावून जाण्याचं कार्य केले आहे, गरजूंना मदत. सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन, कलाकारांना प्रोत्साहन आणि सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणे या माध्यमातुन त्यांनी समाजाशी नाळ जपली आहे. संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवून समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा प्रसार त्यांनी आपल्या कार्यातून केला आहे. 






डोंबिवली ठाणे परिसरातील अनेक नागरिक, कलाकार ,कवी, आणि पत्रकार संतोष सावंत यांना एक प्रेरणास्थान मानतात, त्यांच्या कार्यातून कला आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम  पाहायला मिळतो, अशा व्यक्तिमत्त्वाची मैत्री लाभणे हे खरोखरच भाग्याचे मानले जाते, त्यांची कार्य शैली, साधेपणा आणि माणुसकी यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेआहेत,



आजच्या स्पर्धेच्या आणि दिखाऊपणाच्या युगात प्रामाणिकपणे कला जपणारे, समाजासाठी काम करणारे आणि सत्य मांडण्याचे धैर्य ठेवणारे व्यक्तिमत्व दुर्मिळ झाले आहे की, खरी कला ही माणसांच्या मनाशी जोडलेली असते, त्यांची आगामी कार्य अधिक उंची गाठणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची नाव अधिक उज्वल होवो,अशी शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या