---------------------------------------------
प्रतिनिधी: दिनेश हुमणे, डोंबिवली, आमच्या शाळेचा अभिमान, गुणवत्तेचा नवा मान, शाळा मराठी माझी शाळा मराठी. हे ब्रीदवाक्य ऐकून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर, माध्यमिक डोंबिवली मराठी शाळेतून प्रथम क्रमांक मिळविणारी आणि सातारा जिल्ह्यातील कवठे गावातील विद्यार्थिनी कु. संस्कृती निलेश चव्हाण हिने पटकविले ९६. ४० टक्के गुण. डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा तिने रोवला आहे. मुलीने परीक्षेत चांगले गुण मिळवावे आणि खूप मोठ व्हाव, आज आई वडिलांचे ते स्वप्न पूर्ण झाले. डोंबिवलीतील निलेश चव्हाण यांची कन्या संस्कृती हिने १० विच्या परीक्षेत ९६. ४० टक्के गुण मिळवले. हा आनंदाचा क्षण आणि आईवडील एकदम चकित झाले. डोळ्यात आनंदाश्रु पाहून एक क्षण संस्कृतीच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्री नगर देवी चौक येथे राहणारे निलेश चव्हाण हे, एका खाजगी कंपनीत २५ वर्षांपासून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या लेकीला खूप मोठं कराव, तिने डोंबिवलीतच नव्हे तर देशभरात नाव मोठं कराव हे त्या पित्याच स्वप्न आहे. आई वडिलांच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्कृतिने १० विच्या परीक्षेत खूप मेहनत घेतली. संस्कृती म्हणते, मी वडिलांच स्वप्न पूर्ण करण्याकरता वर्षभर खूप अभ्यास केला. स्वामी विवेकांनंद विद्यामंदिर, विष्णुनगर शाळेतून शिक्षण घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप मेहनत घेऊन शिकविले. मुख्याध्यापक मान. श्री रायसिंग सर, पर्यवेक्षक सौ. रानडे मॅडम, सर्व सहकारी शिक्षक, श्री लक्ष्मण शिंदे सर, सौ. गढरी मॅडम, श्री गवळी सर, श्री सपकाळे सर, श्री शिंपी सर, सौ. पोतदार मॅडम, सौ. खर्चेमॅडम, सौ. देसाई मॅडम, सौ.नाईक मॅडम, सौ. केळकर मॅडम, सौ. देशपांडे मॅडम, सौ. मराठे मॅडम, सॊ. रेखा मॅडम यांचे खूप खूप आभार मानले. माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी काहीही कमी पडून दिले नाही. आणि आज मी माझ्या शाळेचे,आईवडिलांचे आणि नातेवाईकांचे नाव आभिमानाने उंच केले आहे. असे संस्कृती म्हणाली. प्रकट महाराष्ट्रचे संपादक रविंद्र जाधव कोतापकर, डोंबिवली प्रतिनिधी दिनेश हुमणे आणि शाळेतील शिक्षक, श्री. लक्ष्मण शिंदे यांनी संस्कृती हिच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या