-----------------------------------
महिला दिनाच्या निमित्ताने दिपेश म्हात्रे फाउंडेशन पश्चिम आणि स्वराज्य महिला मंडळ यांच्या वतीने प्रभागातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गुणगौरव पश्चिम ठाकुरवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सौ.रसिका जयेश म्हात्रे,सौ.संजीवनी दीपेश म्हात्रे,सुंदरबाई कृष्ण म्हात्रे आणि काशीबाई जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर प्रेरणा देशपांडे,उज्वला भोईर,लता पाटील विश्वेता धर्णे,प्रीती चंदनशिवे, सपना कदम, शैक्षणिक क्षेत्रात वैशाली केशव भोईर,सारिका सतीश मोरे,अपर्णा आगाशे,सुरेखा गायकवाड अनामिका कुलकर्णी औद्योगिक व्यवसायात शोभा घुगे एडवोकेट बिना संसारे सामाजिक क्षेत्रात काशीबाई जाधव, सुंदरबाई म्हात्रे व मनीषा म्हात्रे व पूजा सूर्यवंशी आणि सौ गौरी खुंटे यांचा शाल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.नंतर जागतिक महिला दीना निमित्त केक कापून प्रमुख पाहुण्या सौ.संजीवनी म्हात्रे आणि रसिका म्हात्रे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन घावठ सर यांनी केला. आमचे प्रतिनिधी रवी जाधव, डोंबिवली.

0 टिप्पण्या