--------सभासदांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य,सहाय्यक निबंधक/उपनिबंधक एस आर ए कडे तक्रार.
........ संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
---------------------------------------------
मुंबई ( प्रतिनिधी) भांडुप पश्चिम येथील रणधीर विहार एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. या संस्थेमध्ये संस्थेच्या व्यवस्थापन समितीने त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय आर्थिक अनियमितता केल्यामुळे सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी या संस्थेची व्यवस्थापन समिती दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून बरखास्त करून श्री आनंदा पाटील बदलापूर ठाणे यांची प्राधिकृत अधिकारी/प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली असता आपल्या पदाचा कार्यभार नियुक्तीच्या आदेशापासून 70 दिवस उशिरा स्विकारल्यानंतर संस्थेमध्ये एखादा दुसरा अपवाद वगळता ते संस्थेच्या कार्यालयात उपस्थित राहिलेले नाहीत त्यांनी संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी ऑडिटर पॅनलवर असणाऱ्या प्रमाणित लेखापरीक्षकाची संस्थेच्या सभासदांना कोणतीही कल्पना न देता परस्पर नियुक्ती केली असल्याने सभासदांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच प्रशासकीय कार्यभार हाती घेतल्यानंतर आवश्यक असणारी विशेष सर्वसाधारण सभा/वार्षिक सर्वसाधारण सभा , सन 2024 व सन 2025 या कालावधीत घेतलेली नाही त्याचबरोबर संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षणही अद्याप केलेले नसून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये नमूद केलेल्या कायदा , कलम, नियम, आदेश, यांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच संस्थेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने याबाबत मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे त्याचबरोबर मा. विभागीय सहनिबंधक मुंबई विभाग , सहाय्यक उपनिबंधक ,उपनिबंधक एस आर ए सहकारी संस्था बांद्रा मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असून या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आलेली नसल्याचे संस्थेचे सभासद व ज्येष्ठ नागरिक श्री बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
या संदर्भात अधिक माहिती अशी की, संस्थेचे प्रशासक आनंदा पाटील यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई विभागातील रहिवासी नसल्यानेअपात्र केले होते त्यानंतर त्यांनी चेंबूरच्या पत्त्यावर अग्रीमेंट बनवल्यानंतर पात्र करण्यास भाग पाडले अशा पद्धतीने त्यानी वारंवार शासनाचे नियम आदेश व कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची रीतसर तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे करून सुद्धा कोणीही अद्याप पर्यंत दखल घेतलेली नाही. तसेच संस्थेचे विशेष लेखापरीक्षण चालू असताना अपात्र प्रशासकांनी अधिकाराचा गैरवापर करून हुकूमशाही पद्धतीने तसेच नियमबाह्य व बेकायदेशीररित्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता नियमाचे उल्लंघन करून गणेश कदम यांची निवडणूक अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्याने प्रोविजनल मतदार यादी प्रसिद्ध न करता थेट अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली त्यामुळे अक्षय, हरकती द्यावयाची संधी कोणाला दिलेली नसल्याने सदस्याचे मूलभूत हक्क हिरावले गेले. अशा अनेक प्रकारे निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार व महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 मधील नियम 6 ते 11 व इतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अवैद्य निवडणूक प्रक्रिया पार पडली असून निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सहाय्यक उपनिबंधक / उपनिबंधक एस आर ए यांनी पदाधिकारी यांच्यावर संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचे निष्पन्न होऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई
प्रशासक व संबंधित अधिकाऱ्याने केलेली नाही. त्यामुळे या संस्थेतील रहिवाशावर अन्याय झालेला आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी तक्रारीचे निवारण करत नसतील तर, त्याचबरोबर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने रणधीर विहार सोसायटीचे सर्व रहिवासी राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच लोक आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही संस्थेचे जेष्ठ नागरिक व रहिवासी बाळकृष्ण तावडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



0 टिप्पण्या