सामाजिक संस्थानी लोक हिताचे उपक्रम राबवावेत ! -- नगरसेविका - डॉ. आदिती खुरसंगे


-----------------------------------
मुंबई :-- आपण समातील जनतेचे सामाजिदृष्ठ्या कांही ना कांही तरी देने लागतो हेच लक्षात घेऊन कोकणस्थ या संस्थेने आज पर्यंत राबविलेले सर्वच उपक्रम गौरवस्पद आहेत. असे गौर्वोदगार नगरसेविका डॉ. आदिती खुरसंगे यांनी कोकणस्थ च्या 10 व्या वर्धापनदिनी व जागतिक महिला दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले. असेच समाजकार्य प्रत्येक व्यक्तीने केल्यास समाजपरवर्तन होण्यास नक्कीच मदत होईल असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्या डॉ. खुरसंगे यांनी केले.
             कोकणस्थ विषयी गेल्या 10 वर्षांचा आढावा घेताना संस्थापक अनिल राऊत म्हणाले की, कोणतीही संस्था स्थापन करणे सोपे आहे पण ती टिकवणे फारच कठीण आहे. त्यासाठी आवड, चिकाटी आणि जिद्ध हवी तरच आपण अशा संस्था कार्यरत ठेऊ शकतो. कोकणस्थने आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबीर, चष्मा वाटप, ज्येष्ठ नागरिक व वृद्धाश्रमात डायफर, परेल येथील किड्स कॅन, कॅन किड्स या लहान मुलांच्या कॅन्सर संस्थेला दप्तर, ब्लॅंकेटचे वाटप, के इ एम मध्ये फळांचे वाटप, आगरीपाडा येथील अपंग शाळेत शालोपयोगी वस्तूचे वाटप, आणावं कुडाळ व पंधुर येथील महिलश्रमात उपयोगी वस्तूंचे वाटप, दादर येथील कमला मेहता अंध शाळेत अन्नदान व संत गाडगेबाबा धर्मादाय ट्रस्ट मध्ये अन्नदान, वडाळा येथील कुष्ठरोग रुग्णालयात चादर व 
गाद्यांचे वाटप केलेले आहे.
           सदर समारंभात जागतिक महिला दिनांनिमित्त विविध क्षेत्रातील  श्रीमती - वृंदा ठाकर - शैक्षणिक सेवा, सौ. रोहिणी महाडिक - समाजसेवा, कु. आश्रिया वस्त कला, क्रीडा व शैक्षणिक, सौ. सुनीता वझारकर - अपंग सक्षमीकारण, सौ. मनीषा गांगण - समाजसेवा  या  महिलांची निवड करून त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत केले. तर करावके शो मधील  विद्या आरोसकर, वैशाली रेवाळे, निशिता सातार्डेकर, संध्या सबनीस, अनुजा जैस्वार, रंजना झोरे, सुजाता कदम, डॉ. रुचिता  सावंत, उज्वला घोगळे, मंगला गांगुर्डे, स्नेहा मोलक, कविता गिरी, सौ. साक्षी सावंत व संगीता रेणुगुंथा या इतर महिलांना ही सन्मानीत केले. 
            महिलांनी महिलासाठी आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्षा - अनिता राऊत होत्या. यापुढेही कोकणस्थ समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असेही अध्यक्ष यांनी उपस्थितना सांगितले. यावेळी करावके शो चे उत्कृष्ठ सूत्रसंचलन प्रमोद सातार्डेकर यांनी त्यांच्या सिनेपद्धतीने केले. तर उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोदी व मार्मिक शब्दात पत्रकार -  दत्ताराम दळवी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या