या अभंगातील भावार्थ जणू प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला, JMF Malshej Canopy मंदिर, सायले गाव येथे या भव्य दिव्य नवीन मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित दोन दिवसीय प्राणप्रतिष्ठा, गायत्री यज्ञ व दीपोत्सव या पवित्र आनंदोत्सवात.
या दिव्य सोहळ्यात श्री गायत्री माता, भगवान शिवलिंग, श्री गणेश व श्री दत्तगुरु यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
मंत्रोच्चार, यज्ञाची पवित्र अग्नि आणि दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशात प्रत्येकाच्या अंतःकरणात अद्भुत शांतता आणि समाधानाची अनुभूती होत होती.
विशेष म्हणजे, त्या क्षणी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आपसूकच वाहू लागले—हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर परम आनंद, भक्ती आणि दैवी स्पर्शाचे होते.
प्रत्येक देवतेच्या मुखमंडलावर उमटणारे वेगवेगळे भाव पाहून असे जाणवत होते की, साक्षात परमेश्वर आपल्यामध्ये अवतरला आहे.
हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर प्रत्येकाच्या जीवनाला आध्यात्मिक उंची देणारा, अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि आनंदाने ओथंबून टाकणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
“जेथे श्रद्धा, भक्ती आणि समर्पण असते, तेथेच परमेश्वराचा खरा वास असतो. आणि त्या क्षणी—देह आणि डोळे दोन्ही धन्य होतात.” 🙏
हा सोहळा शेकडो गायत्री परिवार व जे एम परिवार व आमंत्रित गणमान्य भक्तसमुदाय साक्षीने 28 व 29 मार्च 2026 ला पार पडला.
या आनंदप्रद प्रवासात ईश्वर निर्मित या दिव्य वास्तू करिता निमित्त बनवून डॉ राजकुमार एम कोल्हे व सौ प्रेरणा राजकुमार कोल्हे धन्य झाले आहेत. श्री लक्ष्मी कांत पौडवाल यांच्या देखरेखीखाली, श्री बाबू चौधरी यांच्या अनेक कामगारानी या मंदिर उभारण्यात आपले श्रम दिले. अवधूत देसाई, राकेश भांगे, किशोर निकम, आदित्य सिंह, दिवाकर मौर्य, ओम परब, अंकलेश, शिवम व देशमुख परिवार यांचे अथक परिश्रम या विधि विधानाला गायत्री स्वरुप सौ संध्या पाटील व विद्वान पंडित श्री विजय धारवाडकर, श्री व सौ डिंपल सोनू सिंग, शांताबाई झोपे, स्मिता दळवी,
सैलजा महाजन अणि संपूर्ण गायत्री परिवार अनेक हृदय स्पर्शी आत्म्याचे विशेष सहकार्य लाभले. भविष्यात या भव्यदिव्य मंदिरात कायमस्वरूपी ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविधालय या आध्यात्मिक संस्थेचे सचित्र प्रदर्शनी व राजयोग ध्यान देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

0 टिप्पण्या