छायांकित दिवाळी अंकास (पोस्टमन) उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान.



प्रतिनिधी, मुंबई. काही दिवसांपूर्वीच अग्रोन्यूज परिवार चैरिटेबल ट्रस्ट आयोजित छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार २०२६ घोषित करण्यात आले होते. 

उत्कृष्ट दिवाळीअंक

१) शब्दवेल- संत साहित्य विशेषांक 

२) छायांकित- पोस्टमन

३) सुभाषित- विनोदी विशेषांक 

४) दीपोत्सव- युवा राष्ट्रचेतना 


सदरचे पुरस्कार फलटण येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित होणाऱ्या ९ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान केले. आज मराठी गौरव दिन याचे औचित्य साधून हा पुरस्कार "छायांकित दिवाळी अंकास" प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समूहातील सदस्य सौ. मिरा खंडागळे यांनी सदर सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून या सन्मानाचा स्वीकार केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश सस्ते होते तर परीक्षक प्रा. विजय काकडे लाभले होते.

     नव्या दमाच्या "छायांकित" या दिवाळी विशेषांकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संपादक भूषण सहदेव तांबे आणि संपूर्ण छायांकित समूहाचे सर्व स्तरांवर कौतुक करण्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या