घाटकोपर येथील ​साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कर्मभूमीला गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांची भेट;



-------त्वरित राज्य सरकारने राष्ट्रीय स्मारक उभे करावे. जनतेची मागणी

------------------------------------------

​मुंबई: (प्रतिनिधी)  लोकशाहीर व  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी असलेल्या घाटकोपर येथील चिराग नगर परिसराला नुकतीच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष व गुणवंत कामगार डॉ.  प्रभाकर तुकाराम कांबळेसह  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. या भेटीदरम्यान अण्णाभाऊंच्या ऐतिहासिक निवासस्थानाची पाहणी करण्यात आली आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

                ​याप्रसंगी टिळक नगर येथील सर्वोदय बुद्ध विहार व सर्व समाज सेवा संघाचे अध्यक्ष भंतेजी धम्मराज आणि ज्येष्ठ समाजसेवक व अण्णाभाऊ साठे यांचे जवळचे स्नेही  शहाजीराव थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.

​           ​साहित्यरत्न  अण्णाभाऊ साठे यांनी चिराग नगरच्या  मातीत राहून आपल्या अजरामर साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या घराची पाहणी करताना त्या काळातील संघर्षाच्या आठवणींना गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनी उजाळा दिला . असून भंतेजी धम्मराज यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समतावादी विचारांची आजच्या काळात  गरज असल्याचे सांगितले 

       : ज्येष्ठ समाजसेवक शहाजीराव थोरात यांनी अण्णाभाऊंच्या कर्मभूमीचे जतन करून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

​या भेटीमुळे चिराग नगर परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अण्णाभाऊंच्या घराची दुरावस्था झालेली असून राज्य सरकारने  लवकरात लवकर  राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत , अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी  व्यक्त केली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या