'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ' अशा घोषवाक्याने अंगातील रक्त सळसळते तीच तरुणाई म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा मराठी माणूस.
दिनांक १९ फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी मिळालेले एक सोनेरी पान आहे. जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये देखील वन्दे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे , खजिनदार जान्हवी कोल्हे , नगरसेवक श्री.विश्वनाथ जी राणे , पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाडर सर तसेच इतर पदाधिकारी व सर्व विद्यार्थी कार्यकर्ते यांनी पालखी मधून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली, संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी पालखी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच आरती ओवाळून व फुलांचा वर्षाव करत जे एम एफ मंडपम मध्ये विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या नादात पालखीचे आगमन केले . ' जय शिवाजी , जय भवानी ' च्या घोषात सारा आसमंत दुमदुमून गेला . जे एम एफ संस्थेची आठ मजली इमारत एखाद्या किल्ल्याप्रमाणे सजवली होती.
सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी मराठमोळा वेष परिधान करून आले होते त्यामुळे जे एम एम आवराला खरोखरच शिवनेरी किल्ल्याचे स्वरूप आले होते. शिवाजी महाराजांची बाल मूर्ती पाळण्यात ठेवून झुलवा पाळणा गाणे म्हणत सर्वांनी पाळणा झुलवला.
जिजाबाई होत्या म्हणून आज शिवाजी घडला , दादोजी कोंडदेव सारखे गुरु त्यांना लाभले तर जीवास जीव देणारे सखा मित्र मावळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले, आणि इतिहास घडला. त्यांच्या सारखेच तुम्ही देखील संकटांना सामोरे जाण्याचे साहस दाखवा आणि तुमचा इतिहास घडवा असे सांगून संस्थापिका डॉ प्रेरणा कोल्हे यांनी तरुणाईला प्रेरित केले.
गेले एक महिन्यापासून शिवजयंतीच्या तयारीला झटलेले वैभव मंडल , पराग सुतार, यश बडेकर, साहिल सिंग, साई कुडतुडकर, किमया म्हात्रे, वेदिका राजदेव, सार्थक गवळी, वैभव पाचकर , शुभम शिंदे, राकेश प्रधान, सूर्यावसंथरा , मयांक कोठारी, तन्वी गुरव, निधी अमीन, तसेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय असे शेकडो व नामनिर्देशित केलेल्या या सर्व होतकरू विद्यार्थांनी मनापासून शिवजयंती उत्सवाच्या. नियोजनाची तयारी करून मोठ्या उत्साहात आणि शिव गर्जनेत शिवजयंती साजरी केली.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

0 टिप्पण्या