कल्याण डोंबिवली महापालिका २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २१ मध्ये महायुतीचा उमेदवारांचा विजय निश्चित - जनतेचा भरघोस पाठिंबा.

 कल्याण डोंबिवली महापालिका २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २१ मध्ये महायुतीचा उमेदवारांचा विजय निश्चित - जनतेचा भरघोस पाठिंबा.           



 डोंबिवली : प्रतिनिधी)          

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अंतर्गत प्रभाग क्र. २१ मध्ये महायुतीकडून शिवसेनेच्या रेखा जनार्दन म्हात्रे ( पॅनल - क ) ,भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप महादू जोशी ( पॅनल - अ ) आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. रविना राहुल म्हात्रे ( पॅनल - ब ) हे तिन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त भरघोस पाठिंबा मिळत असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. माजी नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या २०१० साली नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत त्यांनी आपल्या कार्यकाळात सातत्याने लोकहिताची कामे केली. त्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संधीत प्रभाग क्षेत्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी तब्बल दोन वेळा समर्थपणे सांभाळत आपली नेतृत्वक्षमता सिद्ध केली. जनतेशी असलेली आपुलकी आणि कामातील प्रामाणिकपणा यामुळे त्या आजही प्रभागातील विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.त्यांचे पती जनार्दन म्हात्रे हे गेली २० वर्षाच्या कार्यकाळात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून समाजसेवेत सक्रिय होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रभागातील नागरिकांपर्यंत मूलभूत सुविधा प्रभावीपणे पोहचवण्याचे कार्य करण्यात आले आहे. उद्योगपती प्रदीप महादू जोशी यांनी लोकांच्या सुख - दुःखात नेहमीच सहभाग घेतला आहे. आरोग्याविषयी मदत, मोफत वह्यावाटप कोरोनी काळात लसीकरण, अन्नदान , रक्तदान शिबिर  तसेच रस्ते,पायवाटा , गटारी आणि पाणीटंचाईच्या समस्यांबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरवठा करून प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. डॉ. रविना राहुल म्हात्रे या दिवंगत माजी नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांच्या सुनाबाई आहेत. त्यांच्या निधनानंतर श्रीमती गुलाब श्रीधर म्हात्रे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून २००५ साली त्यांना नगरसेविका म्हणून निवडून दिले होते. त्यांची शिस्त ,ठाम भूमिका ,कर्तव्यदक्षता आणि निर्मळ मनाची परंपरा पुढे नेत डॉ. रविना म्हात्रे या समाजसेवेचा वारसा अखंड सुरू ठेवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.समाजसेवेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रभाग क्र.२१ मधील अ - ब - क पॅनलच्या उमेदवारांना धन्युष्यबाण व कमळ या चिन्हासमोर बटण दाबून  भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या