कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक: प्रभाग २२ मधून भाजप उमेदवार श्री. प्रकाश गोपीनाथ भोईर यांचा जनतेला विकासाचा शब्द

 कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक: प्रभाग २२ मधून भाजप उमेदवार श्री. प्रकाश गोपीनाथ भोईर यांचा जनतेला विकासाचा शब्द    

 (डोंबिवली प्रतिनिधी),






कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक २२ मधून श्री. प्रकाश गोपीनाथ भोईर यांनी उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी मतदारांसाठी प्रचार पत्रक प्रसिद्ध करत विकासाचा शब्द दिला आहे.


श्री. भोईर हे कमळ या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पत्रकात त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून केलेल्या सामाजिक, सहकारी व सार्वजनिक कार्याचा आढावा मांडला असून, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले आहे.


स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक विकास या क्षेत्रांवर विशेष भर देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवीन नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.


केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाच्या विकासात्मक धोरणांचा उल्लेख करत, देश व राज्याच्या प्रगतीसाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. भाजप पॅनलमधील सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या