हक्कांसाठी लढा, बदल नवा घडवूया – शिवसेनेच्या वतीने जनतेला आवाहन




डोंबिवली : “हक्कांसाठी लढा, बदल नवा घडवूया” या ब्रीदवाक्याखाली शिवसेनेच्या वतीने डोंबिवली परिसरात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असून, आगामी काळात सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


या पत्रकाद्वारे शिवसेनेचे कार्यकर्ते मी. वैशाली शिवाजी पोटे (वैशाली किरण म्हात्रे) आणि श्री. किरण साहेब म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. मुंबईतून डोंबिवलीत स्थायिक झाल्यानंतर शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


पत्रकात पाणीपुरवठा, नाल्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रस्त्यांची अवस्था, महिला व युवकांसाठी रोजगार, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, तसेच सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.


राजकारणात केवळ सत्तेसाठी नाही तर नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. निवडणुकीपुरते आश्वासन न देता सातत्याने जनतेसोबत राहणारे नेतृत्व देण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात आला.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवत, पुढील पाच वर्षांत डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.


शेवटी, “जय हिंद! जय महाराष्ट्र!” या घोषणेने पत्रकाचा समारोप करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या