कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक २०२५-२६ निवडणुकीत प्रभाग क्र. २५ मनसेच्या धात्रक कुटुंबांची दमदार एन्ट्री - ' इंजिन चिन्हावर मतदान देण्याचे आवाहन

 




डोंबिवली : प्रतिनिधी


***********

कल्याण डोंबिवली महानगरपालिका २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली प. प्रभाग क्र. २५ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनीषा शैलेश धात्रक ( पॅनल - अ ) , पूजा शैलेश धात्रक (पॅनल - ब ) आणि शैलेश रमेशचंद्र धात्रक ( पॅनल - क ) हे तीनही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माझी नगरसेवक शैलेश धात्रक , माझी नगरसेविका मनीषा धात्रक या दापत्यांनी भाजपमध्ये तब्बल १८ वर्ष सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत विविध विकास कामे केली 

. पक्षभेद न पाहता नागरिकांच्या आडीअडचणी सोडविण्याच्या भूमिकेमुळे " धात्रक " हे नाव प्रभागात विश्वासाचा ब्रॅण्ड बनले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या " इंजिन " या निवडणूक चिन्हावर प्रभाग २५ मधील अ - ब - क पॅनेलमधील तिन्ही उमेदवार विजयी ठरतील,असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना शैलेश व मनिषा धात्रक यांनी सांगितले की, " २००७ सालापासून आम्ही राजकारणाकडे सेवेचे माध्यम म्हणून पाहिले आहे. २०१० व २०१५ मध्ये मतदारांच्या प्रेमळ आशीर्वादामुळे आम्हाला प्रभागाची सेवा करण्याची संधी मिळाली. कोरोना महामारीच्या कठीण काळातही नगरसेवक नसतानाही  कोव्हिड - १९ लसीकरण करून जीव वाचवण्याची आम्ही  जबाबदारीने काम केले आहे. " मात्र गेल्या काही दिवसात जाणीवपूर्वक खोट्या वावड्या आणि आरोप पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. " आम्ही कधीही तीन जागांची मागणी केली नव्हती. आमच्यावर अन्याय झाल्यामुळेच आम्ही मनसे प्रवेश केला. मनसेचे प्रदेश नेते राजूजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २५ मधील तीनही जागांवर उमेदवारी दाखल केली असून आमचे सर्व नामनिर्दशन अर्ज वैध ठरवले आहे. " असे त्यांनी सांगितले १ व २ जानेवारी रोजी झालेल्या बिनविरोध निवडणुकांवर टीका करत शैलेश धात्रक म्हणाले ," १२२ पैकी २१ जागा  बिनविरोध जाणे हे लोकशाहीसाठी चिंतेचे आहे. आज गरज आहे ,  ती निर्भय मतदानाची." शेवटी मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, " राजकारणाच्या पलीकडे जाऊन पारदर्शक व प्रामाणिक कारभार करण्याचा आमचा निर्धार आहे. सर्वसामान्य माणसासाठी झटणारे उमेदवारांना प्रभाग क्र. २५ अ - ब - क पॅनलमधील  ' इंजिन ' चिन्हावर बटन दाबून निवडून देऊन, विकासाला गती देण्याची मनोगत व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या