ठाणे -डोंबिवली | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये प्रचाराला जोर आला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर आवाहन पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रकाद्वारे मनसेचे उमेदवार श्री. शैलेश रमेशचंद्र धात्रक, सौ. मनीषा शैलेश धात्रक आणि कु. पूजा शैलेश धात्रक यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व नागरी समस्यांवर सातत्याने काम केल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.
कोरोना काळात केलेली मदत, नागरिकांच्या अडचणींसाठी केलेले पाठपुरावे तसेच प्रभागातील पायाभूत सुविधांसाठीचा संघर्ष याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. “रेल्वे इंजिन” या चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, प्रभागातील विकासासाठी नवे व निर्णायक नेतृत्व देण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे. “निरागी समोरिल बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा” असा स्पष्ट संदेश या जाहीर आवाहनात देण्यात आला आहे.

.jpeg)
0 टिप्पण्या