******** (डोंबिवली : प्रतिनिधी)
कल्याण - डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर डोंबिवली प. प्रभाग क्र. २२ अ-ब - क - ड पॅनेलमधून महायुतीचे अधिकृत शिवसेना उमेदवार विकास गजानन म्हात्रे ( पॅनल - ड ) आणि कविता विकास म्हात्रे ( पॅनल - क ) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी नगरसेवक असलेल्या विकास म्हात्रे व माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी १५ वर्षात प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. पाणी टंचाईवर यशस्वी पाठपुरवठा करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा,रस्त्यांचे काँक्रीटीकरण ,सांडपाणी निचरा,सुरक्षा व्यवस्था,अग्निशमन केंद्र उभारणी,महिला सक्षमीकरण,आधारकार्ड शिबिर,गणेश घाटाचे सुशोभीकरण ,स्मशानभूमी नूतनीकरण अशी अनेक विकासकामे त्यांनी पूर्ण केली आहेत.कोरोना काळातही विकास म्हात्रे, कविता म्हात्रे यांनी २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी झटत कोविड - १९ लसीकरण ,अन्नदान,आरोग्यसेवा अशा उपक्रमाव्दारे जनतेला आधार दिला. " तुमची हाक आणि आमची साद" हे समीकरण प्रभागातील नागरिकांशी घट्ट नाते जुळले असून याच विश्वासाची जोरावर ते पुन्हा निवडणुकीत उतरत आहेत. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात " धनुष्यबाण " या चिन्हासमोर बटण दाबून आपल्या प्रभागाचा विकासासाठी पुन्हा एकदा पाठिंबा द्यावा ,असे आवाहन माजी नगरसेवक विकास म्हात्रे व माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी मतदात्यांना केले आहे.


0 टिप्पण्या