वडाळा गांवचे आठवणीतले सर ❗

----------------------------------

मुंबई , वडाळा गांवात जसे विठ्ठलाचे प्रतिपंढरपूर प्रसिद्ध आहे तसे आमच्या सुयश क्लासचे सर देखील तितकेच प्रसिद्ध आहेत आणि त्या क्लासेसचे सर म्हणजे श्री. सुभाष सोमा कदम सर. अत्यंत हुशार, जिद्द, झटपटीने, चिकाटीने आणि चातुर्याने अभ्यास शिकवून, सर्व विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेणे, हे त्यांच्या उजव्या हाताचा खेळ आणि विद्यार्थिही तेवढ्याच जोमाने पाठांतर करीत असे.
      आमची १९९८ ची बॅच आजही आठवते. सर ते सरच, ते कुठलेही असो. क्लासचे असो वा शाळेचे. यंदा २०२५ मध्ये २७ वर्षे झाली. आणि नवीन उमेद मिळाली. सरांना भेटण्याचा योग आला,आणि आजही आम्हाला आमच्या क्लासच्या निमित्ताने आमची शाळा, शाळेचा मैदान, बसायचा बाक, आमचे शिपाई मामा, आमचे सर, मॅडम आजही आठवतात आणि जास्त आठवण येते ती म्हणजे आमच्या क्लासचे सर. पाचवीपासून दहावीपर्यंत एकत्र क्लासमध्ये अभ्यास घेऊन जे काही विद्यार्थी त्यांनी असे घडविले, कि ते विद्यार्थी आता शिकून सातासमुद्रापार गेले आहेत. मोठमोठ्या हुद्द्यावर आज आहेत. तेही सर्व त्यांची आठवण काढत असतात. जेवढा काठीचा मार म्हणजेच (दंडाराज) मिळायचा तेवढा अभ्यास व पाठांतर तेवढ्याच ताकदीने व्हायचा. आजही हातावर मार खाल्लेला दंडाराज आठवतो. एकदा दंडाराज हातावर पडला की, दुसऱ्या दिवशी क्लासला येण्यासाठी विद्यार्थी कंटाळा करायचे. पण विद्यार्थी येत वेळेवर असत. आईवडिलांची माया त्यांनीही केलीय. हे कोणासाठी आमच्यासाठीच, हे आता आम्हाला कळतय. एवढं मारून, गोंजारून, काही येत नसेल तर ते सारखं सारखं सांगणे. हा त्यांचा आगळा वेगळा स्वभाव.
       एवढा प्रसिद्ध क्लास की, त्या वडाळा गांवचे सर्व मुले जास्तीच जास्त विद्यार्थी, विद्यार्थीनी एकाच दादर हिंदू कॉलनी, किंगजॉर्ज शाळेत जात असल्याने क्लासही बऱ्याच जणांचा सुयश क्लास असायचा. यात दुमतच नाही. तेव्हा हा सुयश क्लास एवढा प्रसिद्ध होता की, जो तो विद्यार्थी तिथेच शिकवणी घेण्यासाठी आतुर असायचे. आजही ते सर जसे दिसत होते तसेच आम्हाला भेटले आहेत. तेही २७ वर्षानंतर, पण दुसऱ्या विभागात. विभागाची नवीन सुधारणामुळे त्यांना तिथून जावे लागले. मोबाईलमध्ये आपला सुयश क्लासच्या नावाने ग्रुप सुद्धा सूरू आहे. आजही क्लास सुरु आहे पण नेरुळला. संजीवनी ग्रुप टयुशन हे आज नेरुळच्या विद्यार्थ्यांना घडवीत आहे. तिथे ते स्वतः, त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, भावाची मुलगी हे पाचजण आजही सर्व विद्यार्थ्यांना ट्युशनच्या नावाप्रमाणे संजीवनी देण्याचे अहोरात्र प्रयत्न करित आहे. विभाग बदलला म्हणून हार न मानता त्यावर मात करुन उज्वल यश मुलांना कसे प्राप्त करता येईल यावर जास्त भर हे संपूर्ण  कुटुंब करीत आहे. अश्या ह्या कुटुंबाला आम्ही सर्व मित्र मैत्रिणी, आणि तुमचे अखंड असलेले विद्यार्थी नतमस्तक होऊन, हात जोडून, मनपूर्वक नमस्कार करीत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या