कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन, नाशिक तर्फे ओळख पत्र वितरण कार्यक्रम


कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन, नाशिक तर्फे नवनिर्वाचित सदस्यांना ओळख पत्र वितरण कार्यक्रम नुकताच शनिवार, 08/11/2025 रोजी दुपारी 3.00 वाजता "आशय" बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बोराडपाडा रोड, जांभिळघर, अष्टांग योग च्या पाठीमागे, बदलापूर, पश्चिम, ठाणे -421503 येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुनिलसिंह लता पुरणसिंह परदेशी उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात पोलिस मित्र म्हणून कार्य करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. 

अध्यक्षांच्या शुभ हस्ते उपस्थित सर्व सदस्यांना ओळख पत्रासोबत नियुक्ती प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले. 


या कार्यक्रमात  वर्ष २०२५-२०२७ करिता सर्वसुश्री स्वाती सुनील आफळे, डॉ. रेवती कृष्णा आळवे, मालती शाह, मालिनी नागदा, शालिनी विराणी, रीना गुजरमल,  उषा मुंडे,  स्वाती यादव, सुरेखा गायकवाड, सर्वश्री मंगेश गुजर, कैश कोहली, मनोज साळुंखे, प्रमोद बैरागी, मुकेश पारसकर, समीर जाधव, मनोज थत्ते, सुभाष वाढवल, गणेश मोरे, किरण ठाकूर, गणेश पडवळ, जयेश शाह, महेश वाघ, विशाल कारखानीस, कुणाल आचरेकर, राहुल आमले, विश्वास सावंत या सर्वांना सदस्यत्व बहाल करण्यात आले.


या व्यतिरिक्त कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह राष्ट्रीय अध्यक्षांनी "आशय" बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमात रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सुश्री स्वाती सुनील आफळे, गोरेगाव मुंबई महिला अध्यक्ष डॉ. रेवती कृष्णा आळवे, अंबरनाथ शहर महिला अध्यक्ष सुश्री मालती शाह, अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री मंगेश गुजर, बदलापूर शहर अध्यक्ष श्री कैश कोहारी,  ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोज साळुंखे, सौ. मालिनी नागदा, सौ. साळुंखे  या सर्वांची विशेष उपस्थिती  होती.


 

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, कर्तव्यदक्ष पोलिस मित्र आणि "आशय' बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संचालक, श्री मनोज साळुंखे यांनी केले. तसेच संस्थेच्या पदाधिकारी सौ. साळुंखे ताई यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या