वडाळा,मुंबई प्रतिनिधी : संगिता गुरव. राष्ट्रसंत प.पु. पाचलेगांवकर (संचारेश्वर) महाराजांच्या ११३ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनशैलीवर आणि कार्यशैलीवर त्यांचे शिष्य अनुयायी श्रीकांत सावंत यांनी संपादीत केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच चंचल हॉल वडाळा येथे महाराजांच्या नाम जयघोषात भक्तीमय वातावरणात जगद्गुरु राष्ट्रसंत दत्तानंद स्वामी यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या करण्यात आले. आजच्या संगणकिय व इंटरनेटच्या युगात तरुण मंडळी, विद्यार्थी व इतरही समाजसेवक भक्तीरसाच्या अभ्यासापासून दूर जावू लागले आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षणा बरोबर साधु संताच्या भक्तीभावाचा व शिकवणीचा अभ्यास केल्यास आपण करीत असलेले कर्म चांगल्या प्रकारे पार पडू शकते असे उद्गार प.पू. सद्गुरुदत्तानंद स्वामी यांनी मार्गदर्शन करताना काढले. यावेळी समाजसेवक - अनिल गलगली यांनी सुध्दा मार्गदर्शन केले उपस्थित शिष्य बंधु भगिनिना काही अनुभव सांगून महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत पाचलेगांवकर (संचारेश्वर) महाराज सेवा समितीचे कार्याध्याक्ष श्रीकांत सावंत यांनी १९७० साला पासूनच्या महाराजांच्या कार्यसेवेचा मुद्देसुद आढावा घेतला. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन मनोभावे आरती करण्यात आली. त्यात महाराजांनी आधात्मसेवा व भक्तीसेवा कशी कशी केली तेही सदरच्या विशेषांकात प्रसिध्द करण्यात आलेली असल्याचे सांगितले. आजचा हा कार्यक्रम आणि इतरही राष्ट्रकार्य महाराज आपल्याकडून करवून घेत आहेत म्हणून या विशेषांकाची किंमत फक्त महाराजांची सेवा ही ठेवली आहे असे सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. यावेळी राष्ट्रसंत पाचलेगांवकर (संचारेश्वर) महाराज सेवा समिती मुक्तेश्वर आश्रमचे विश्वस्त जयप्रकाश ठाकुर व विठ्ठल परब, अवधूत सारंग, सुनिल देवरुखकर, दत्ताराम दळवी, रविंद्र कोतापकर, दिनेश हुमणे व संगीता गुरव आणि असंख्य गुरुशिष्य, व भाविक उपस्थित होते. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या