डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीने मोफत कर्करोग जागृती शिबिराचे आयोजन.


--                


(प्रतिनिधी, रवि जाधव कोतापकर.)

शिवसेना शाखा कोपर डोंबिवली पश्चिमच्या व इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९. ३० ते दुपारी ३. ०० वाजेपर्यंत माजी नगर सेवक श्री. रमेश म्हात्रे यांच्या राजाई टॉवर येथील कार्यालयात कॅन्सर जागृती शिबीरचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन केले. या वेळी माजी नगरसेवक श्री. विश्वनाथ राणे आणि माजी नगर सेविका वृषाली रणजित जोशी हजर होत्या. या वेळी मोठया संख्येने महिलांनी शिबिराला हजेरी लावली होती. कॅन्सर हा वेळेवर उपचार केले तर बरा हाऊ शकतो. शिबिरात तोंडाच्या आणि घशाची तपासणी व महिलांची आणि पुरुषांची शारीरिक तपासणी तज्ञ् डॉक्टर व टेक्निशियन यांनी केली. व तज्ञ डॉक्टर्सने मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. शाखा प्रमुख चंद्रशेखर खेडेकर, अंकुश उतेकर, विजय राणे, मिलिंद म्हात्रे,अजय भरवाडा, रमेश चिपकर, राकेश जुईकर आणि महिला शाखा प्रमुख भागीरथी माने, हिरा भाभी वाघेला, स्वप्ना शहा, प्रीती अहिरे, सुरेखा कनोजिया, रिया घाडगे, सेजल जेठे आणि दीपा कदम या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या