श्री स्वयंभू सिद्धीविनायक गणपती मंदिर, गोरेगाव चा ५९ वां वर्धापन दिवस दिमाखात साजरा





 श्री स्वयंभू सिद्धीविनायक गणपती मंदिराने  ५९ वा वर्धापन दिवस आणि कोजागिरी पोर्णिमा  सालाबाद प्रमाणे  त्रिवेणी सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी भोंडल्याचा कार्यक्रम सादर केला.... असा हा अद्भुत भव्य कार्यक्रम भाविकांची उपस्थितीत, खासकरुन बहुसंख्येने महिलांच्या सहभागाने विशेष चंद्र देवतेच्या पूर्ण रुपातील दर्शनाने बहरुन गेला .... मंदिराच्या बाहेरील मोकळ्या मैदानामुळे पूर्ण कार्यक्रमात चंद्रदेवही वरुन जणूकाही आंनदाने बेभान झाल्यासारख वाटत होत ... सादरकर्त्या महिलांच्या पारंपरिक मोहक वेशभूषेत, त्याच्या उत्तम अदाकारी  ने हा कार्यक्रम पार पडला... सर्व भाविकांना एका रम्य आनंदी वातावरणात प्रसन्न करुन गेला  .... कार्यक्रमाची सांगता चविष्ट पोहे व शरद पोर्णिमेची परंपरागत स्वादिष्ट मसाले  दुधाच्या वाटपाने झाली सर्वांना तृप्त केले. आपली हिंदू परंपरा जपण्यासाठी तसेच नवीन पिढीवरही  संस्कार व्हावेत ह्या हेतूने भोंडला कार्यक्रम आयोजित केला जातो.


श्री स्वयंभू गणपती मंदिर चे अध्यक्ष  माननीय श्री उदय कुंजविहिरी जोशी यांनी  उकृष्टपणे आयोजलेल्या या सुंदर कार्यक्रमा बद्दल उपस्थित भाविकांचे मनपूर्वक आभार मानले.  या शुभ प्रसंगी मंदिराचे विश्वस्त सौ. उज्ज्वला जोशी, श्री व सौ वैशाली रवि जोशी आणि इतर कार्यकर्ते सेवक, सर्वश्री वी.एम.भूतकर, किबे, राजेंद्र लामखेडे, विनायक बंगाळे, श्रीकांत कदम, गणेश नल्ला, संजय राणे, सर्वसुश्री स्मितल, सुमती, चारुशीला,  हर्षा, डॉ.रेवती  आणि इतर भाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या