खारदेवनगर पालिका वसाहतीत सारनाथ बुद्ध विहाराचे लोकार्पण!
मुंबई - चेंबूरच्या खारदेवनगर महापालिका वसाहतीत सारनाथ बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नुकताच शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४२४ चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खारदेवनगर पालिका वसाहतीत १९७९ साली सारनाथ बुद्ध विहार बांधण्यात आले होते. त्यानंतर त्याचा पहिला जीर्णोद्धार १९९१ नंतर २००४ मध्ये करण्यात आला होता.पत्रकार प्रसाद जाधव यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्याकडे या बुद्धविहाराचे नूतनीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तुकाराम काते यांच्या प्रयत्नाने नुकतेच या बुद्धविहाराचे नूतनीकरण करून लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.यावेळी समाजसेवक तुषार काते,विधानसभा निरीक्षक रवी महाडीक, महिला शाखाप्रमुख किशोरी कडू,चिटणीस रवी सावंत, न्यु.खारदेव गृहनिर्माण सोसायटीचे सरचिटणीस राजन जाधव,सारनाथ बुद्ध विहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभय धारपवार, सरचिटणीस प्रणय जाधव,दुष्यंत बापेरकर,पत्रकार प्रसाद जाधव,उपस्थित होते. संबोधी महिला मंडळाने कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती.
0 टिप्पण्या