जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये नवरात्री निमित्त ' नव शक्ती सन्मान सोहळा चे आयोजन.



     दिनांक २२ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. दुसऱ्या माळेला म्हणजेच दिनांक २३ सप्टेंबर रोजी नवरात्र आणि जे एम एफ संस्थेच्या संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नव शक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

     संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर अतिथी यांचे स्वागत जन गण मन विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य करून केले तर जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी नव दुर्गेची रूपे साकारून सर्व मान्यवरांना सन्मानाने व्यासपीठावर आणून स्थानापन्न केले.


      मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

   "या देवी सर्व भूतेषु स्वस्तिरूपेन संस्थिता

 नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः "

शिव शंभूची भामिनी म्हणजेच पार्वती देवीची अनेक रुपे आहेत आणि पार्वतीची च शक्ती म्हणजे स्त्री शक्ती होय.

जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर चे असे अनेक महिला पालक आहेत की जे घर संसार सांभाळून स्वतःचा व्यवसाय करतात तर कुणी पोलिस खात्यामध्ये आहे, तसेच रिक्षाचालक, शिंपी , परिचारिका, पत्रकार, शिक्षक गृहिणी, हवालदार, प्रभाग परिचारिका , चायनिज पदार्थांची गाडी व्यवसाय करणारे अशा  सर्व निवडक पालकांना जे एम एफ संस्थेने  नव शक्ती सन्मान सोहळा प्रदान करण्याकरिता आमंत्रित केले होते. या सर्व स्त्री शक्तींना व्यासपीठावर सन्मानाने बोलावून सचिव डॉ प्रेरणा कोल्हे व खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी विधिवत साडी खण नारळाने त्यांची ओटी भरली व मस्तकावर शोभेचा मुकुट चढवून सर्वांचा सन्मान केला.हा क्षण सर्वांच्याच अभिमानाचा क्षण होता.


     ज्याचा ना आदी ना अंत आहे आहे असा देवांचा देव महादेव .ज्यावेळी शंकराला पार्वती अर्पण केली तेव्हा त्याला शक्ती प्राप्त झाली आणि म्हणुनच शिवशक्ती एकरूप होऊन विनाशाचा संहार करता आला, आदिशक्ती पार्वती मातेपासून ते आत्ता पर्यंतच्या सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक रूपमधून आपल्याला स्त्री शक्तीचे दर्शन घडले आहे, एक स्त्री काय करू शकत नाही सर्वच गोष्टी एकाच वेळी करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज नव शक्ती सन्मानाने सन्मानित झालेल्या या महिला म्हणजेच आमच्या शाळेमधील पालक आहेत .याचा आम्हला सार्थ अभिमान वाटतो असे उद्गार संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी काढले व त्यांचे अभिनंदन केले.

     एका स्त्री ने दुसऱ्या स्त्रीचा केलेला सन्मान म्हणजे शक्ती आणि युक्तीचा संगम आहे.हिंदू धर्मामध्ये स्त्री ला देवीचे रूप मानले आहे आणि खण नारळाने ओटी भरून तिच्या तेजाने ब्रह्मांड देखील तेजस्वी होऊन जाते .आज माझे अहोभाग्य च म्हणावे लागेल की आजच्या दिवशी माझा वाढदिवस साजरा झाला व सर्व देवींचे आशीर्वाद मला मिळाले आणि मी धन्य झाले .असे सांगून सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी उपस्थित शक्तींची यथायोग्य ओटी भरली तसेच दुर्गेच्या रुपातल्या नऊ देवी बनून आलेल्या सर्वांची देखील ओटी भरली त्यावेळी सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले.यावेळी खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी देखील सर्वांचे अभिनंदन करून आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पार्वतीचे रूप अन्नपूर्णा आहे आणि अशी आई माझी अन्नपूर्णा माता आहे , असे सांगून जान्हवी कोल्हे यांनी डॉ प्रेरणा कोल्हे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


जन गण मन विद्यामंदिरच्या प्राचार्या यांनी दुर्गेवर नृत्य सादर केले. तर जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा मधील काही निवडक पालकांनी नवरात्र उत्सव या आशयावर  अतिशय सुन्दर देवी नृत्य सादर करून उपस्थितांना अचंबित केले . गणपती उत्सवात शाळेमध्ये मोदक स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या मधील विजेत्या पालकांना देखील प्रशस्तीपत्रक, चषक आणि चांदीची लक्ष्मी गणेशची प्रतिमा देण्यात आली.

    जे एम एफ संस्थे अंतर्गत शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर पालकांनी मोठा केक आणून व भेटवस्तू देऊन डॉ प्रेरणा कोल्हे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. तर सकाळ आणि दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांनी डॉ प्रेरणा कोल्हे यांना स्वहस्ताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड  तसेच गुलाबाची फुले भेट दिले व त्या सर्व कार्ड व फुलांचा संग्रह करून ठेवण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्रेया कुलकर्णी यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या