जे एम एफ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी विद्यालयीन व महाविद्यालयीन युवक विद्यार्थ्यांना स्वदेशी भारत व नशा मुक्त युवा बद्दलचे व्याख्यान दिले.
मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये 500 चा वर युवा विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
व्यसन म्हणजे काय..तर एखाद्या गोष्टीची सवय . मग ती गोष्ट चांगली असो अथवा वाईट. चांगल्या गोष्टींचे व्यसन हे आयुष्याला कलाटणी देणारे असते आणि उच्चत्व कडे नेणारे असते तर वाईट गोष्टीचे व्यसन हे आयुष्य रसातळाला नेते , असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले तसेच सगळ्यात वाईट नशा म्हणजे दारू, ड्रग्स याशिवाय गरज नसताना देखील गोळ्यांचे सेवन करणे होय.त्यामुळे मानवी मेंदूवर त्याचे कसे आणि किती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात व मनुष्य स्वतःचा आत्मविश्वास गमवून बसतो .जीवनामध्ये मित्र असावेत परंतु वाईट संगत नसावी. नशा मुक्त युवा सशक्तीकरण करण्यासाठी सर्व युवकांनी प्रतिज्ञा करावी व वाईट नशा पासून दूर रहावे असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी युवकांना सांगून त्यांच्याकडून प्रतिज्ञा वदवून घेतली.
नशा ही अभ्यासाची असावी, नशा ही देशसेवेची असावी, नशा ही समाजसेवेची असावी तर नशा ही उज्वल भवितव्याची असावी असे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात युवकांना सांगून नशे पासून मुक्त होऊन चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रवृत्त केले.यावेळी मध्यंतरात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त युवा अभियान यावर पथनाट्य सादर केले.
उपस्थित असलेले सर्व युवा विद्यार्थी यांना संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी देखील एकच सल्ला दिला की व्यसन आणि व्यसनाधीन यामधला फरक ओळखून वाईट मार्गावर जाऊन व्यसनाधीन न होता फक्त चांगल्या गोष्टींचे च व्यसन लावून घ्या. व जीवनात अमूल्य बदल घडवून आणा असेही सांगितले. या कार्यक्रमाला ब्रह्मा कुमारी संस्था चे खूप मोठे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या