जे.एम.एफ.चे जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूलध्ये प्रगती महाविद्यालयाकडून सायबर क्राईम जनजागृती सत्र संपन्न*

डोंबिवली (पश्चिम), –
आजच्या डिजिटल युगात मुले व विद्यार्थी सतत मोबाईलचा वापर करतात, तसेच GPay, Fampay सारख्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सचा वापर, Instagram, YouTube आणि गेम्समध्ये वेळ घालवणे हे सामान्य झाले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
ही गरज लक्षात घेऊन, ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती महाविद्यालय, डोंबिवली (पूर्व) व क्विकहील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" सायबर क्राईम जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल डोंबिवली (पश्चिम) येथे पार पडले. सत्राचे नेतृत्व साईराज पवार आणि वैभव मोरे , या प्रगती महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी केले.

या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम म्हणजे काय, ते कसे घडते, त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे आणि जर फसवणूक झालीच तर काय करावे याची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये फेक लिंक्स, फोटो मॉर्फिंग, व्हिडीओ कॉल स्कॅम, ओटीपी फसवणूक, पासवर्डचं रक्षण, मालवेअर व व्हायरसेस यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

सत्र खूपच संवादात्मक आणि माहितीपूर्ण होते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले, प्रश्न विचारले आणि सत्रात उत्साहाने सहभागी झाले. दिलेल्या माहितीबद्दल विद्यार्थ्यांनी दाखवलेली उत्सुकता विशेष उल्लेखनीय होती.

या सत्रातील खास आकर्षण म्हणजे सादर केलेल्या सायबर क्राईमवर आधारित शायऱ्या, ज्यामुळे वातावरण आनंदी झाले आणि विद्यार्थ्यांनी सत्राचा मनापासून आनंद घेतला.

शाळेतील शिक्षकांनी सत्राबाबत उत्तम अभिप्राय दिला, व सांगितले की ही माहिती विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि काळानुरूप होती.

प्रगती महाविद्यालय व क्विकहील फाउंडेशन यांच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जागरूकता निर्माण करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे, आणि साईराज पवार व वैभव मोरे यांचे या अभियानातील योगदान उल्लेखनीय ठरले.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ व्यवस्थापनाचा या प्रकल्पा मध्ये विशेष असा अनमोल पाठिंबा आहे, तसेच प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे,आयटी विभाग प्रमुख सौ. रूपाली पाटील  यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

 क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के, तसेच सक्रिय टीम सदस्य - साक्षी लवंगारे, गायत्री केसकर व दिपू सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

प्रगती कॉलेज आणि त्यांच्या क्विक हिल सायबर वॉरियर्सचा हा उपक्रम समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सदर कार्यक्रम जे.एम.एफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे सर, सचिव डॉ.प्रेरणा राजकुमार कोल्हे यांच्या अनमोल सहकार्याने पार पडले. तसेच या साठी विशेष सहकार्य उपप्राचार्य प्रा.एकनाथ चौधरी सर यांचेकडून प्राप्त झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या