नवी मुंबई : भारत सरकार मान्यता प्राप्त, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर वृत्तपत्रकार संस्था(संघ) यांच्या विद्यमाने झालेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत नेरुळ येथील भालचंद्र विनायक माने यांना प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल पत्रकार पदविका प्रदान करण्यात येत आहे. सदर पत्रकार पदविका प्रदान समारंभ रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी रोटरी क्लब सभा, नाशिक येथे नरहरी जिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री (महाराष्ट्र शासन), पद्मश्री चैत्राम जी. पवार निसर्ग व पर्यावरण संरक्षक, धुळे, दिनेश भोईर संस्थापक अध्यक्ष, दिनेश भागीरथ भोईर सामाजिक प्रतिष्ठान व सौ. कृतिका संदीप मराठे, संचालिका, पत्रकार पत्रिका कोर्स. यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पदविका कोर्स श्रीमती कृतिका देशपांडे यांनी खूप सखोलपणे अभ्यासक्रम तयार केला असून या कोर्समध्ये वृत्तपत्रिकेचा इतिहासाबरोबरच आधुनिक व्हिडिओ एडिटिंग, लघुलेखन, ऑडिओ कंटेंट, मॅनेजमेंट, वेब डिझाईन या सोबत संशोधन तपास मुलाखत, अहवाल देणे, लेखन अशा अनेक गोष्टी बरोबर पत्रकारांना संपूर्ण पत्रकारिता करण्याचे ज्ञान, कायदेशीर बाबीसह पत्रकारिता, पुस्तकाद्वारे विषयातील अभ्यासक्रम आणि व्हाट्सअप च्या संदेशाद्वारे माहिती देऊन तसेच आखणी बंद प्रश्नपत्रिका द्वारे परीक्षा घेऊन उत्तीर्ण पत्रकारांना शासन मान्यताप्राप्त पदवीदान प्रदान करण्यात येते. यामुळे पत्रकारांना आत्मविश्वासासह समाजसेवेसाठी हे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
शालेय शिक्षणापासून भालचंद्र माने यांना वाचन, लेखन याची आवड होती. नवी मुंबईतील पत्रकार सुभाष हांडे देशमुख यांनी मला प्रोत्साहित केले आणि थोडे बहुत लिहिता लिहिता माझी पत्रकारिता वृद्धिंगत होत गेली. असे प्रांजळपणे सांगत भालचंद्र माने सांगतात की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था यांची जाहिरात फेसबुकवर पाहिल्यानंतर तेथे संपर्क साधला व श्रीमती कृतिका संदीप मराठे यांनी पत्रकार कोर्स बद्दल मोलाचे मार्गदर्शन केल्यानंतर सदर कोर्स पूर्ण केला. चांगल्या गुणवत्तेने पास झाल्याने आणि खूप माहिती गाठीशी आल्याने मला पत्रकारिता करण्याकरता आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
--------------------------------
प्रेषक :
*सुभाष हांडे देशमुख*
नेरुळ
0 टिप्पण्या